चप्राड येथे रेतीचे सात ट्रक पकडले
By Admin | Updated: May 22, 2014 00:50 IST2014-05-22T00:50:35+5:302014-05-22T00:50:35+5:30
आंतर जिल्ह्यातील एका रेतीघाटावरून ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक

चप्राड येथे रेतीचे सात ट्रक पकडले
भंडारा : आंतर जिल्ह्यातील एका रेतीघाटावरून ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक करताना तब्बल लाखांदूर तहसील कार्यालयाच्या पथकाने सात ट्रक पकडले. याप्रकरणी ट्रक मालकांविरुद्ध ४१ हजार ६00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील सावंगी रेती घाटावरून वडसा पवनी मार्गे नियमित ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती येथील महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. सदर माहितीच्या आधारावर येथील महसूल प्रशासनाने चप्राड येथे तब्बल सात ट्रक पकडले. या ट्रकमध्ये २00 घनफूट हून अधिक रेती असल्याचे आढळून आल्याने एकूण ४१ हजार ६00 रु. दंड ठोठावण्यात आला. यापूर्वी १७ मे रोजी देखील येथील महसूल विभागाने ओव्हरलोड रेतीचे ९ ट्रक पकडले होते. त्यावेळी एकूण ५७ हजार ६00 रु. दंड ठोठावण्यात आला होता. केवळ चार दिवसात सुमारे एक लक्ष रु. ची दंडात्मक कारवाई करताना महसूल अधिकारी सागर कांबळे, गौतम रंगारी, वाहतूक पोलीस अरविंद अंबादे, तलाठी बाळबुधे यांनी चोख भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)