मतदानासाठी सात हजार 406 कर्मचारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:56+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी सात हजार ४०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

मतदानासाठी सात हजार 406 कर्मचारी नियुक्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून मतदानासाठी सात हजार ४०६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दहा संवेदनशील, दाेन अतिसंवेदनशील, १७ नक्षलप्रभावित मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
त्यासाठी सात हजार ४०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामध्ये १३१ क्षेत्रीय अधिकारी, १४५५ मतदान केंद्राध्यक्ष आणि ४३६५ मतदान अधिकाऱ्यांचा समावेश असून सुरक्षेसाठी १४५५ पाेलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात तुमसर तालुक्यात दाेन आणि लाखांदूर तालुक्यात आठ असे दहा संवेदनशील तर लाखांदूर तालुक्यात दाेन अतिसंवेदनशील आणि १७ नक्षलप्रभावी मतदान केंद्र आहेत. निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांचे दाेन प्रशिक्षण पुर्ण झाले असून शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त
- निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त राहणार आहे. पाेलीस अधिक्षक व अपर पाेलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात आठ डीवायएसपी, २३ पाेलीस निरीक्षक, १४७ सहायक पाेलीस निरीक्षक, १८७० पुरुष पाेलीस कर्मचारी, ७०० हाेमगार्ड, एसआरपीएफच्या तीन प्लाटूनचा समावेश आहे.
२८ हजार लीटर दारु जप्त
- निवडणूक आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या माेहिमेत २७ हजार ९४० लीटर दारुसाठा जप्त केला आहे. बारा लाख १५ हजार ७१४ रुपयांची ही दारु असून याप्रकरणी ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.