क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पोलिसांसह सात जणांना अटक

By Admin | Updated: April 30, 2017 00:21 IST2017-04-30T00:21:21+5:302017-04-30T00:21:21+5:30

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस असतात. मात्र पोलिसच गुन्ह्यात सहभागी असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची?

Seven people arrested for playing gambling on cricket | क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पोलिसांसह सात जणांना अटक

क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पोलिसांसह सात जणांना अटक

जामिनावर सुटका : भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची साकोलीत कारवार्र्र्र्
साकोली : गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस असतात. मात्र पोलिसच गुन्ह्यात सहभागी असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? असाच एक प्रकार साकोलीत उघडकीस आला आहे. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने साकोलीत क्रिकेटच्या जुगारावर धाड घालून एका पोलीस शिपायासह सात जणांना ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाने या आठही जणांना जामीन दिला असला तरी या प्रकरणाची परिसरात चर्चा आहे.
साकोली येथे क्रिकेटच्या जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेशन विभाग भंडारा यांनी सेंदुरवाफा येथे धाड मारली. यावेळी साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सखाराम बोरकर (३२), ओमप्रकाश इस्तारी धुर्वे (२२), पंकज हेमराज मुंगुलमारे तिघेही रा. सेंदुरवाफा, कमलेस दिनदयाल परशुरामकर (१९) रा. घाटबोरी, मंगेश नागदेव ढेंगरी (२३), प्रणीत बलराज नंदेश्वर (२१), रोहीत लल्लन गुप्ता (२४) तिघेही रा. साकोली यांना आयपीएलचे प्रक्षेपण सामन्यावेळी खेळ सुरु असतांना भ्रमणध्वनीद्वारे लोकाकडून पैसे घेऊन क्रिकेटवर जुगार खेळत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचेकडून दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण चार लाख ३० हजार रूपयांचे साहित्य जप्त केले आहे. या आठही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seven people arrested for playing gambling on cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.