वाहनासह साडेसात लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: June 8, 2016 00:27 IST2016-06-08T00:27:09+5:302016-06-08T00:27:09+5:30
ठाणेदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असलेली देशी विदेशी दारु पिकअप वाहनासह पकडण्यात पवनी पोलीस यशस्वी झाले आहेत

वाहनासह साडेसात लाखांची दारू जप्त
पोलिसांची कारवाई : ७.५० लाखांचे साहित्य जप्त
पवनी : ठाणेदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असलेली देशी विदेशी दारु पिकअप वाहनासह पकडण्यात पवनी पोलीस यशस्वी झाले आहेत. चार लाखाची देशी विदेशी दारु व साडे तीन लाख किमतीचे वाहन जप्त करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार १० ते १० वाजताचे दरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांना दारुचा साठा पवनीबाहेर जात असल्याची माहिती मिळाली. भंगार माता मंदिराजवळ तातडीने पोहचून टाटा झेनियो पिकअप व्हॅन क्र. एम.एच. ३६ एफ २१२९ ला थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये मॅकडॉल १४८ बॉक्स आयबी १० बॉक्स, ३ देशी दारु १८९ बॉक्स अंदाजे किंमत ४ लक्ष व पिकअप व्हॅनची किंमत ३,५०,००० लक्ष रुपये अशी एकूण ७ लक्ष ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व गाडी मालक गुणवंत झिंगर लांजेवार रा.ताडेश्वर वॉर्ड पवनी याला अटक केली. सदर दारू साठा चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत होता.
पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन गदाहे तपास करीत आहेत. सुरेश चुटे, भागवत मुंडे, सचिन खराबे आदींनी ही कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)