आमगाव येथे दोन दिवसात सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:38+5:302021-04-23T04:37:38+5:30
या दोन दिवसांमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. एकाचा मृत्यू सामान्य रुग्णालय भंडारा येथे झाला ...

आमगाव येथे दोन दिवसात सात जणांचा मृत्यू
या दोन दिवसांमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. एकाचा मृत्यू सामान्य रुग्णालय भंडारा येथे झाला तर इतर सहा जणांचा मृत्यू घरीच झाला. मागील अनेक दिवसांपासून यांना ताप येत असल्याची माहिती असून प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. मंगळवार व बुधवारी या सर्वांच्याच मृत्यू झाल्याने गावामध्ये चर्चा व्याप्त असून आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची मागणी गावकरी करीत आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने निर्जंतुकीकरणची फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. गावकरी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करीत असून मेडिकल व किराणा दुकाने सोडून सर्व व्यवसाय बंद आहे. येथे डॉक्टरांकडे बाहेर गावातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असून स्थानिक डॉक्टरांनी आपला परिसर निर्जंतुकीकरण करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.