अपघातात सात जखमी
By Admin | Updated: January 25, 2017 00:35 IST2017-01-25T00:35:43+5:302017-01-25T00:35:43+5:30
लाखांदूर - साकोली मार्गावर बस व काळीपिवळी आणि सेंदूरवाफा टोलनाका अशा विविध दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

अपघातात सात जखमी
उपचार सुरु : साकोली सेंदूरवाफा येथील घटना
साकोली : लाखांदूर - साकोली मार्गावर बस व काळीपिवळी आणि सेंदूरवाफा टोलनाका अशा विविध दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आज मंगळवारला सकाळी बस क्रमांक एम.एच. ४०/९३८० ही महालगावहून साकोलीकडे प्रवासी घेऊन येत असताना मागेहून येणाऱ्या काळीपिवळी क्रमांक एम.एच. ३६ / ३३११ ने धडक दिली. यात शंकर दोनोडे (५५) रा.विहिरगाव, सविता घरडे (३०) रा. पारडी, अजिज खान युसुफ खान (६७) रा.सिव्हील लाईन गोंदिया हे किरकोळ जखमी झाले. तर सेंदूरवाफा येथील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. यात निखील पिलदाई, गौरव चुटे, अभय दोनोडे, आनंद मेंढे हे जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)