वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा

By Admin | Updated: August 28, 2016 00:27 IST2016-08-28T00:27:56+5:302016-08-28T00:27:56+5:30

वनांचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व ...

Settling for the Workers Issues | वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा

उपवनसंरक्षकांचे आश्वासन : वनकर्मचारी संघटनेला यश
भंडारा : वनांचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेने भंडारा उपवनसंरक्षक अतुल वर्मा यांच्याकडे दाद मागितली. यातील अनेक समस्यांवर त्यांनी तोडगा काढल्याने वनकर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक ललीतकुमार उचिबगले, भंडारा जिल्हाध्यक्ष सैय्यद इरशाद महमूद अली, एम.जे. नंदूरकर, वनमजूर संघटनेचे केंद्रीय सदस्य संपतराव खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष राजू झंझाड यांच् या नेतृत्वात उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावर वर्मा यांनी अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तर काही समस्या वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये जंगलामध्ये काम करीत असताना बीट गार्डला मदतनिसची गरज आहे. अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या बिट गार्डला दोन मदतनिस तर सर्वसाधारण क्षेत्रातील बिटगार्डला एक मदतनिस देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सोबतच वनकर्मचाऱ्यांना गणवेश शिवण्यासाठी ५०० रुपये वाटप करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच सर्व वनकर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेच्या आत देण्याचे शिष्टमंडळाला कबूल केले. वनमजुरांना कायम प्रवास भत्ता १५०० रुपये देण्याचेही अभिवचन यावेळी त्यांनी दिली.
तपासणी नाक्यावर शौचालय नसल्याने महिला कर्मचाऱ्यांची दैनावस्था होत होती. त्यामुळे सर्व नाक्यांवर शौचालय बांधणीच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बऱ्याच वनकर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मिळत नव्हता. ते थकीत असल्याने ते काढून देण्याचे निर्देशही संबंधित लिपिकाला दिले.
मागील अनेक वर्षापासून बिट नकाशे नसल्याने ते लगेच पुरवठा करण्याचे निर्देशही वर्मा यांनी दिले. यासोबतच अन्य मागण्यांचा निपटारा तातडीने करण्याचे यावेळी त्यांनी कबुल केले. यावेळी अतुल राऊत, प्रलय डोरले, अर्चना बडोले, सलीम शहा यांच्यासह वनकर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Settling for the Workers Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.