शिबिरात २९९ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:08+5:302016-01-02T08:34:08+5:30
तालुक्यातील ओपारा येथे महाराजस्व अभियान २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओपारा येथे समाधान शिबिरात विविध १३७ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

शिबिरात २९९ प्रकरणांचा निपटारा
ओपारा येथे समाधान शिबिर : अधिकाऱ्यांची उपस्थिती
लाखांदूर : तालुक्यातील ओपारा येथे महाराजस्व अभियान २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओपारा येथे समाधान शिबिरात विविध १३७ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. सदर शिबिर २९ डिसेंबर २०१५ ला घेण्यात आला असून या विसेस शिबिरात प्राप्त प्रकरणापैकी सर्वच प्रकरणाचा निपटारा करण्यात आला हे विशेष.
यामध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र ३६, जातीचे प्रमाणपत्र २१ अधिवास प्रमाणपत्र ८, नॉनक्रिमेलेअर ७, प्रतिज्ञालेख ८४, जेष्ठ नागरिक ओळखपत्र ३१, शिधापत्रिका दुय्यम प्रती ३०, शिधापत्रिका नाव कमी, समाविष्ठ करणे ३५, आधारकार्ड नोंदणी १४, अनाधिकृत अकृषक प्रकरणे ३३ असे एकूण २९९ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून यात प्रामुख्याने उपस्थिती व्ही.एच. कावळे नायब तहसीलदार लाखांदूर, वासूदेव तोंडरे उपसभापती लाखांदूर, राजू राऊत सरपंच ओपारा, देविदास राऊत सरपंच पाहुणगाव, छाया ठाकरे सरपंच डोकेसरांडी, चैतु रंगारी उपसरपंच डोकेसरांडी, रिध्देश्वर ठाकरे ओपारा, छत्रपती नाकतोडे पोलीस पाटील डोकेसरांडी, एस.व्ही. हलमारे मंडळ अधिकारी विरली बु., आर.एस. ढोमणे, आर.एम. शेंडे , मेश्राम तलाठी मोहरणा, नागपुरे तलाठी किरमटी, आर.बी. ढोक लिपीक तहसील कार्यालय लाखांदूर, ए.यु. उईके, सार्वे शिपाई आदी कर्मचारी, अधिकारी व बऱ्याच मोठ्या संख्येत उपस्थित राहून सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)