सामान्य नागरिकांची सेवा हाच शासकीय सेवेचा खरा उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:02 IST2019-06-03T01:02:28+5:302019-06-03T01:02:48+5:30
शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे.

सामान्य नागरिकांची सेवा हाच शासकीय सेवेचा खरा उद्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे. या उद्देशाने सेवा केलेल्या व लोकांच्या अडीअडचणी सोडविणाºया अधिकाऱ्यांना नागरिक कायम सन्मान देत असतात. ही बाब समोर ठेवून शासकीय सेवा करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
शासकीय कामकाज करताना नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी, प्रत्येकाचे बोलणे समजावून घ्यावे. कनिष्ठांना कामाचे महत्व समजावावे. लोकांचे काम करा, तरच शेवटचे आयुष्य सुखा-समाधानाने जाईल, असेही ते म्हणाले. अधिकारी कर्मचाºयांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दररोज नियमित कामकाजातून एक तास काढून व्यायाम करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व जिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर तिनखेडे यांच्या सेवानिवृत्तीप्रीत्यर्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, अभिमन्यु बोदवड प्रामुख्याने उपस्थित होते.
महसूल यंत्रणेची परंपरा कायम ठेवा, तसेच नागरिकांना मदत करा. आधुनिक टेक्नॉलाजी मुळे कामात भर पडली आहे. परंतु कामात पारदर्शकता ठेवा अशा दृष्टीकोनामुळे आपला शासकीय प्रवास सुकर होईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.
सेवा प्रवासात गंतव्यस्थानाकडे जाणे अटळ आहे. सेवानिवृत्तीचा दिवस हा सेवा काळातील सोनियाचा दिवस आहे. शासकीय सेवेत नेहमी प्रत्येक दिवस अडथळयांच्या शर्यतीतून जावे लागते. सेवा प्रवासात येणाºया प्रसंगाचे सिंहावलोकन करणे आज गरजेचे आहे. महसूल विभागात काम करतांना तळागाळातील लोकांची सेवा करण्यास मिळते, ग्रामीणांशी जवळीक साधता येते म्हणूनच मी या विभागात आल्याचे सत्कारमूर्ती दिलीप तलमले यांनी सांगितले. लोकांच्या तक्रारी मार्गी लावतांना नकारार्थी भूमिका न घेता सकारात्मक काम करावे, असेही ते म्हणाले.
उपजिल्हाधिकारी बोदवड यांनी महसूल यंत्रणेच्या कामाची व येणाºया अडचणींविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर तिनखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनी केले तर, उपस्थितांचे आभार जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा आपत्ती अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, मुकुंद टोनगावकर, सर्व तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.