लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कार व दुचाकीत समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता तुमसर-भंडारा मार्गावर शकुंतला सभागृहासमोर घडला. गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका भयानक होता की, कारचा दर्शनी भाग व दुचाकी चेंदामेंदा झाली.अपघातात गंभीर युवकाचे नाव आशिष मनोहर तुमसरे (२८) रा. सालई असे आहे. आशिष तुमसरे दुचाकी क्रमांक एमएच ३१ एएक्स ६३१४ ने खापा येथून तुमसर येथे जात होता तर विरूद्ध दिशेने चारचाकी क्रमांक एमएच ४० बीई ८७५३ मोहगाव (नान्दी) मध्यप्रदेश येथून नागपूर येथे जात होती. शकुंतला सभागृहासमोर समोरासमोर कार व दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीस्वार आशिष तुमसरे दुचाकीसह २० ते ३० फूट हवेत फेकला गेला.यात आशिष गंभीर जखमी झाला. कारचालकाचे नाव प्रविण बिसेन रा. नान्दी असे आहे. अपघातात चारचाकीच्या दर्शनीभागाचा चेंदामेंदा झाला तर दुचाकीचे तुकडे झाले. अपघातानंतर तुमसर-भंडारा मार्गावर मोठी गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शीने येथे दुचाकीस्वार विरूद्ध दिशेने येत होता, असे सांगितले. या रस्त्यावर सुमारे १०० मीटरपर्यंत दुभाजक नाही. शहरात प्रवेश करणारा हा एक प्रमुख मार्ग आहे.आंतरराज्यीय रस्ता असल्याने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहते. तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहे.
कार-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:15 IST
कार व दुचाकीत समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता तुमसर-भंडारा मार्गावर शकुंतला सभागृहासमोर घडला.
कार-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर
ठळक मुद्देशकुंतला सभागृहासमोरील घटना