शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लाच घेताना वरिष्ठ लिपिक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:52 AM

सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.

ठळक मुद्देजिल्हा कोषागार कार्यालयातील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतनातील हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ईसराम पटले याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सेवाकाळातील म्हणजे १ आॅगस्ट २००१ पासून आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पदोन्नती साखळींतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करण्यात आली. तसेच त्याची थकबाकी व सहाव्या वेतन आयोगाचे पाच हप्त्यातील असे एकूण ११ लाख ६३ हजार ४९० रुपयांचे देयक जिल्हा कोषागार कार्यालय येथे प्रलंबित होते. सदर प्रलंबित असलेले बिल वरिष्ठांकडे तपासून मंजुरीकरिता सादर व बिल काढून देण्याकरिता वरिष्ठ लिपीक प्रकाश पटले याने तक्रारदाराला पाच हजार रुपयांची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १५ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदविली. सापडा रचून बुधवारला प्रकाश पटले याला पाच हजार रुपयांची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, हवालदार धनंजय कुरंजेकर, सचिन हलमारे, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक आदींनी केली.