ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

By Admin | Updated: October 8, 2014 23:22 IST2014-10-08T23:22:34+5:302014-10-08T23:22:34+5:30

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात त्यांच्याप्रती आदर असणे म्हणजे सर्वकाही नसून त्यांच्या भावना व दु:ख समजणे आवश्यक आहे. तो समाजाला आरसा ढाकण्याचे काम करतो पण जेष्ठ

Senior Citizen Community Mirror | ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

वरठी : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात त्यांच्याप्रती आदर असणे म्हणजे सर्वकाही नसून त्यांच्या भावना व दु:ख समजणे आवश्यक आहे. तो समाजाला आरसा ढाकण्याचे काम करतो पण जेष्ठ नागरिकांच्या समस्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे प्रतिपादन पूर्व विदर्भ विभाग वरिष्ठ नागरिक संघटनेचे सचिव मनोहर खर्चे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघटना वरठीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र कुलकर्णी, चेतन भैरम, एकनाथ फेंडर, वासूदेव रायपुरकर, उमेश घमे, पुंडलिक सपाटे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने हनुमान वार्ड वरठी येथील हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ अमृत महोत्सवानिमित्त वरठी संघटनेशी संबंधित वयाचे ७५ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिक व माजी मुख्याध्यापक ताराचंद बोरकर, कल्याणराव झंझाडे, लक्ष्मी साठवणे, सीता भोयर, हरिश्चंद्र बोंदरे, केशव शेंडे, श्रावण डोकरीमारे, बाबूराव डोंगरे, रामकृृष्ण बोरकर, तुळसाबाई सेलोकर, सबुर बोरकर, सत्यभामा गजभिये, गंगाराम बोंदरे, देवदास भोवते, आनंदराव चौधरी, श्रावण मते व हरिभाऊ सावठणे यांचा समावेश होता. आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठाची ओवाळणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.
संचालन रवि डेकाटे, प्रास्ताविक श्रावण मते व आभार बाबुराव चोपकर यांनी मानले. कार्यक्रमास संघटनेचे सचिव देवीदास डोंगरे, बाबुराव साठवणे, हरिभाऊ भाजीपाले, नरेंद्र लिमजे, अन्ना झंझाडे, श्रीराम खोब्रागडे, जागनाथ नंदनवार, रमेश रामटेके, सत्यवती मेश्राम, शेंडे, बन्सोड, घनश्याम बोंदरे, महादेव मते उपस्थित होते. (वार्ताहर)
जनजागरण अभियान
लाखनी : समर्थ महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातर्फे हुंडा प्रतिबंध जनजागरण अभियान राबविण्यात आले. अभियानाला प्राचार्य डॉ.संजय पोहरकर, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट बाळकृष्ण रामटेके, भारत बुट्टे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.बाळकृष्ण रामटेके म्हणाले, हुंडा विरोधी अभियान ही जनचळवळ झाली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Senior Citizen Community Mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.