संविधान विरोधकांना घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 00:39 IST2016-09-27T00:39:48+5:302016-09-27T00:39:48+5:30

हलबा, हलबी जमातीच्या पुर्वजांच्या अभिलेखात कोष्टी व्यवसायाची नोंद असली तरी संवैधानिक अधिकार मिळण्यासाठी पात्र आहेत,...

Send the opposition opponents home | संविधान विरोधकांना घरी पाठवा

संविधान विरोधकांना घरी पाठवा

नंदा पराते यांचे आवाहन : भंडाऱ्यात हलबा समाजाचा मेळावा 
भंडारा : हलबा, हलबी जमातीच्या पुर्वजांच्या अभिलेखात कोष्टी व्यवसायाची नोंद असली तरी संवैधानिक अधिकार मिळण्यासाठी पात्र आहेत, यासंदर्भात न्याय निवाडे न्यायालयात झाले. अधिकाऱ्यांनी संविधानाचा सन्मान करून अर्ज स्वीकारावे व अर्जदारांना जातीचा दाखला द्यावा, अर्ज स्वीकारून अधिकाऱ्यांकडून चालढकलपणा करण्यात येतो. त्यामुळे संविधान विरोधी अधिकाऱ्यांना घरी पाठवा, अन्यथा भाजप सरकारला घरी पाठवावे लागेल, असा इशारा आदिमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते दिला.
लहरी आश्रमात आयोजित हलबा समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी अतिथी म्हणून अशोक दलाल, वामन खोत, यादव नंदनवार, अशोक बारापात्रे, गजानन निनावे, प्रवीण नंदनवार, कोलबा बारापात्रे, महादेव हेडाऊ, महेश निमजे, वैशाली निपाने, ललिता खोत, सुधा चामोर्शीकर, कांचन पराते, कुसूम दलाल, भारती नंदनवार, मोरेश्वर निनावे, शामलाल बारापात्रे, बाबुलाल डेकाटे, धर्मराज रायकवार, चेतन हेडाऊ उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या, प्राचीन इतिहास, जनगणना, संशोधन याकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष करून हलबा आदिवासींना कोष्टी व्यवसायामुळे संविधानाच्या सवलतीपासून वंचित ठेऊन अन्याय करीत आहे. विदर्भप्रदेश महाराष्ट्रात सामील झाल्यापासून हलबा, माना, गोवारी या आदिवासी समाजावर अन्याय सुरू झाला. विदर्भातील सरकारी नोकरीवर विदर्भ विरोधकांनी कब्जा मिळविला. विदर्भातील लाखो युवक बेरोजगार आहेत. विदर्भाच्या लोकसंख्येप्रमाणे युवक व विद्यार्थ्यांना नोकरी व शिक्षणामध्ये फायदा मिळाला नाही.
भारतीय संविधानाच्या ३४२ व्या कलमानुसार विदर्भातील कोष्टी व्यवसाय करणाऱ्या हलबा, हलबी या जामतीला अनुसूचित जमातीचा सामाजिक दर्जा मिळाला. प्राचीन इतिहास व जनगणना अहवालाच्या आधारावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्यप्रदेशमध्ये सन १९५० मध्ये सामिल झाला. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी हलबा समाजाला कोष्टी व्यवसायामुळे संविधानाच्या सवलतीपासून वंचित केले. व्यवसायाच्या आधारावर भेदभाव करून हलबा समाजाच्या सवलती नाकारता येत नाही. या मेळाव्यासाठी बाबुराव खोत, पुंडलीक धकाते, शामराव बरबटे, अरुण नंदनवार, देवचंद नंदनवार, रोशन नंदनवार, अनिल दलाल, भूषण सोनकुसरे, चिंतामण गुरूमुखी, बाबुराव नागपुरकर, चंद्रकांत हेडाऊ, अनिल खोत, डॉ. रेवाराम धकाते, माधव हेडाऊ, सेवाराम बुरडे, किरण बारापात्रे, भारती नंदनवार, रेखा निखारे, निशा सोनकुसरे, पुष्पलता गुरूमुखी, कांचन पराते, मिनल निमजे, नंदा पराते यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Send the opposition opponents home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.