शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्या माशांची महाराष्ट्रात विक्री

By admin | Updated: July 25, 2016 00:38 IST

माशांचा प्रजनन काळात शेजारच्या मध्यप्रदेशात मासेमारीवर बंदी आहे. चोरट्या मागौने मासेमारी करुन ....

रॅकेट सक्रीय : मध्यप्रदेशात प्रजननकाळात मासेमारीवर बंदीतुमसर : माशांचा प्रजनन काळात शेजारच्या मध्यप्रदेशात मासेमारीवर बंदी आहे. चोरट्या मागौने मासेमारी करुन ती महाराष्ट्राच्या सीमेत सर्रास विक्री सुरु आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीसह देशातील काही राज्यात मासे प्रजनन काळात बंद आहे. माशांच्या अधिक उत्पादना करीता ही बंदी सर्वत्र लागु करण्याची रगज आहे.पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ सुरु असतो. मादी माशात लाखोंच्या संख्येत अंडी असतात. त्यामुळे मध्यप्रदेशात मासेमारीवर या काळात बंदी आहे. राज्यात कोकण किनारपट्टीवर अशी बंदी घालण्यात आली आहे. तुमसर तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशाला भिडल्या आहेत. तिथे चोरट्या मार्गाने मासेमारी करुन ती मासे तुमसर तालुक्याच्या सीमावर्ती भागात विक्री केली जात आहे. या हंगामात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. ही मासे नागपूर येथे ही नेली जात आहेत. बावनथडी नदी, बावनथडी धरण परिसर, मध्यप्रदेशाच्या सीमेतील तलाव येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी सध्या सुरु आहे.मध्यप्रदेशातील मोठे व्यापारी लहान मासेमाराकडून ही मासे कमी किंमतीत घेतात. पुढे हे मोठे व्यापारी महाराष्ट्रातील सीमावर्ती गावातील बजारात तथा सरळ नागपूरकडे रवाना करीत आहेत. सिमावर्ती गावात लहान मासेमार स्वस्तात मासे विक्री करीत आहेत. त्यामूळे येथील खवय्यांची चांदी आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशांच्या सिमेत सहज प्रवेश करता येते. तशी सक्षम यंत्रणा नाही. मासेमार सहज नदीपलीकडून राज्य मार्गाने प्रवेश करतात. कारवाई केली पाहिजे. यातही प्रशासन येथे अनभिज्ञ आहे. जिल्हाधिकारी यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.मध्यप्रदेशातील मोठ्या प्रमाणात मासे महाराष्ट्रातील शहरात विक्री केली जात आहेत. ती मात्र स्थानिक मासेमार स्वस्तात विक्री करीत नाही. त्यामुळे मोठा नफा येथे कमविला जात आहे. काही मासे खाणे येथे धोकादायकही आहेत. लहान डबक्यात मासे पकडण्याकरिता रासायनिक द्रव्यांचा वापर करतात. अशी माहिती आहे. रासायनिक द्रव्यामुळे मासे मृत्यूमुखी पडतात. अशी मृत मासेही बाजारात आणली जात आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)राज्यात सागरी किनारपट्टीसह देशात काही राज्यात प्रजनन काळात बंदी आहे. उर्वरित महाराष्ट्रात बंदी आणण्यापूर्वी कोळी बांधवांना उदरनिर्वाहाकरिता शासनाने धान्य व इतर मदत केली पाहिजे. तेव्हाच मासेमारीवर बंदी आणावी. प्रजनन काळात मासेमारी केल्याने माशांचे निश्चितच प्रमाण कमी होते. पुढील काळात भरपूर मासे मिळून कोळी बांधवांनी लाभ होईल. याकरिता जनजागृतीची गरज आहे.- सजंय केवट, संचालक राष्ट्रीय मत्सजिवी सरकारी संघ, नवी दिल्ली.