विधानभवनासमोर आत्मदहनाचा इशारा
By Admin | Updated: July 31, 2016 00:33 IST2016-07-31T00:33:43+5:302016-07-31T00:33:43+5:30
तुमसर नगर परिषदेत मुख्याधिकारी यांनी अनियमितपणाची अंमलबजावणी करुन घरमालक यांच्या अनुपस्थित मौल्यवान किंमती...

विधानभवनासमोर आत्मदहनाचा इशारा
मुख्याधिकाऱ्यांची चौकशीची मागणी : घरातून साहित्य पळविल्याचा आरोप
भंडारा : तुमसर नगर परिषदेत मुख्याधिकारी यांनी अनियमितपणाची अंमलबजावणी करुन घरमालक यांच्या अनुपस्थित मौल्यवान किंमती, वस्तू घरातून बाहेर काढल्याच्या विरोधात तक्रारीची चौकशी शासनाने न केल्यास जलज शर्मा विधानसभेसमोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे शासनाला इशारा दिला आहे.
तुमसर येथील दुर्गा नगर येथे जलज शर्मा हे वास्तव्यास होते. तिथे नळकराची मागणीच्या वसुलीकरिता ते अनुपस्थित असल्याचा फायदा घेवून व कोणतीही सुचना न देता त्यांच्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले. त्यांचे साहित्य वाचनालयामध्ये उपयोगी आणले. हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचा आरोप शर्मा यांनी तक्रारीत केला आहे. एप्रिल २०१६ पासून या विरुध्द अनेक तक्रारी केल्या परंतु मुख्याधिकारी गुल्हाणे हे टाळाटाळ करीत आहेत. यापुर्वी आपल्या वाहनावर निळा दिवा त्यांनी लावला होता. प्रशासनाने तो दिवा त्यांना काळायला लावला. गुल्हाणे यांचे काम एककल्ली असून जनतेचा त्याचा त्रास सहन करावा लागतो.
या प्रकरणात शर्मा यांनी आपली मानहानी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. बंद कनेक्शनच्या वसुलीकरिता घराचे कुलूप तोडून सामान काढणे हे बेकायदेशिर आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा विधानभवनासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून शर्मा यांनी केला आहे. (नगर प्रतिनिधी)
नगरपालिका प्रशासन नियमानुसार कर्तव्य बजावित असते. यात चेहरा बघून कारवाई टाळता येत नाही. याप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी झाली पाहिजे. तक्रारदार दोषी आढळल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई होणे गरजेचे आहे.
चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्याधिकारी