६४२ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ

By Admin | Updated: May 9, 2014 23:59 IST2014-05-09T23:59:32+5:302014-05-09T23:59:32+5:30

भंडारा : २४ वर्षांपासून रखडलेला प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Selection Guides for 642 Teachers | ६४२ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ

६४२ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ

भंडारा : २४ वर्षांपासून रखडलेला प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त ६४२ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळणार आहे. या आदेशावर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी स्वाक्षरी केली असून या आदेशामुळे सेवानिवृत्त धारकांमध्ये आनंदाची लाट आहे. परिणामी भंडारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या लढ्याला यश मिळाले आहे. भंडारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने डिसेंबर २०१३ मध्ये निवडश्रेणीच्या लाभ संदर्भात जिल्हा परिषदेसमोर आमरण व साखळी उपोषण केले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींसह जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणण्यात आली होती.यात ज्या शिक्षकांच्या सेवेला २४ वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा प्राथमिक पेन्शनर शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी अशी मागणी होती. तसेच सन १९८९ मध्ये शासनाने शासकी अध्यादेश काढला होता. त्यामुळे असोसिएनने अनेकदा निवेदने सादर केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नव्हते. १०० टक्के निवडश्रेणी मिळालीच पाहिजे, या मागणीवर ठाम असणार्‍या सेवानिवृत्त धारकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी यांनी ४ मे २०१४ रोजी निवडश्रेणीच्या प्रकरणांसंदर्भात आदेशावर तत्काळ स्वाक्षरी केली. त्यामुळे जिल्ह्यातील ६४२ सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळणार आहे. हा आदेश जिल्ह्यातील सातही पंचायत समितीला पाठविण्यात आला आहे. पंचायत समितीनिहाय निवडश्रेणीचा लाभ मिळणार्‍या शिक्षकांची संख्या तालुकानिहाय अशी आहे. यात भंडारा ७९, मोहाडी ३७, तुमसर ११५, लाखनी ९०, साकोली ७७, पवनी ९९ व लाखांदूर पंचायत समितीमधील १४५ सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांची वेतननिश्चिती करुन प्रत्येक पंचायत समितीने सेवापपुस्तके जिल्हा परिषदेकडे पाठवायची आहेत. पदवीधर, केंद्रप्रमुख आणि माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षकांची निवडश्रेणीचे आदेश मे महिन्याच्या शेवटपर्यंत निघणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Selection Guides for 642 Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.