आरटीईसाठी ८५४ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST2021-05-06T04:37:26+5:302021-05-06T04:37:26+5:30

गोंदिया जिल्ह्यातील १४७ शाळांमध्ये ८७९ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या ...

Selection of 854 students for RTE | आरटीईसाठी ८५४ विद्यार्थ्यांची निवड

आरटीईसाठी ८५४ विद्यार्थ्यांची निवड

गोंदिया जिल्ह्यातील १४७ शाळांमध्ये ८७९ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधी दरम्यान जन्मलेली बालके ऑनलाईन प्रवेश नोंदणीकरिता पात्र राहणार आहेत. तालुक्याच्या गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहेत. आमगाव तालुक्यातील १२ शाळांत ८३ जागांसाठी १,२२७ अर्ज आले होते. त्यापैकी ८३ जणांची निवड करण्यात आली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांत १०० जागांसाठी २३३ अर्ज आले होते. त्यापैकी ९३ जणांची निवड करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील १० शाळांत ४४ जागांसाठी २३२ अर्ज आले होते. त्यापैकी ४१ जणांची निवड करण्यात आली आहे.

गोंदिया तालुक्यातील ५८ शाळांत ३४९ जागांसाठी ६,३२७ अर्ज आले होते. त्यापैकी ३४८ जणांची निवड करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील १६ शाळांत ८२९ जागांसाठी ४७१ अर्ज आले होते. त्यापैकी ७९ जणांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Selection of 854 students for RTE