आयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून पालकमंत्री थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:51 IST2019-01-21T22:51:34+5:302019-01-21T22:51:52+5:30
सौर उर्जेवर ३५ किमी धावणारी सायकल, वॉटर हार्व्हेस्टिंग, वीज वापर, पाण्याची बचत असे एकापेक्षा एक सरस मॉडेल्स पाहून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्क झाले. निमित्त होते भंडारा येथे आयोजित आयटीआयच्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीतून समाजहिताचा संदेश दिला.

आयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून पालकमंत्री थक्क
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सौर उर्जेवर ३५ किमी धावणारी सायकल, वॉटर हार्व्हेस्टिंग, वीज वापर, पाण्याची बचत असे एकापेक्षा एक सरस मॉडेल्स पाहून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्क झाले. निमित्त होते भंडारा येथे आयोजित आयटीआयच्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीतून समाजहिताचा संदेश दिला.
जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आयटीआय आणि एनसीव्हीसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तंत्रप्रदर्शनाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. यात ७८ संस्था सहभागी झाल्या होत्या. तेथील विद्यार्थ्यांनी २०० प्रतिकृती सादर केल्या होत्या. उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, नगरपरिषद उपाध्यक्ष आयु गोड्डाने, जिल्हाधिकारी शांतनू गोयल उपस्थित होते. या प्रदर्शनात अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर, फॅशन टेक्नालॉजी, माहिती तंत्रज्ञान, आॅटोमोबाईल्स, कृषी, वॉटर हॉर्व्हेस्टिंग, वीज वापर, इंजिनियअरिंग आणि नॉन इंजिनियरिंग अशा प्रतिकृती सादर करण्यात आल्या. उद्घाटनानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देवून प्रतिकृतीची पाहणी केली. त्यावेळी सौर उर्जेवर ३४ किमी धावणारी सायकल पाहून मंत्री महोदय चकीत झाले. मी स्वत: उर्जा खात्याचा मंत्री असून मला आज येथे नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असे सांगितले. याप्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृतीचे त्यांची कौतुक केले.
या कार्यक्रमाला सहसंचालक चंद्रकांत निनावे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मोहन चौधरी यांनी केले.
राज्यातील सर्वात मोठे प्रदर्शन
भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले आयटीआय विद्यार्थ्यांचे हे प्रदर्शन राज्यातील सर्वात मोठे प्रदर्शन असल्याची माहिती आयोजक तथा जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी प्रदीप घुले यांनी दिली. ते म्हणाले, गत दोन वर्षापासून भंडारा येथे रोजगार मेळावा घेतला जात आहे. त्यातून जवळपास ८०० बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाल्याचे त्यांची सांगितले.