बीज गुणन केंद्र अंधारात

By Admin | Updated: July 14, 2014 23:47 IST2014-07-14T23:47:43+5:302014-07-14T23:47:43+5:30

भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुका बीज गुणन केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करून शेती कशी करावी, कोणते खत किती वापरावे, उत्पन्न कसे वाढवावे इत्यादी विषयावर

Seed multiplication center in the dark | बीज गुणन केंद्र अंधारात

बीज गुणन केंद्र अंधारात

६५ एकर क्षेत्र पडीत : दोन वर्षांपासून मजूर मजुरीपासून वंचित
पहेला : भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुका बीज गुणन केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करून शेती कशी करावी, कोणते खत किती वापरावे, उत्पन्न कसे वाढवावे इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. परंतु ुत्यांच्याच विभागाची पहेला येथे असलेली ६५ एकर शेती दोन वर्षापासून पडीत ठेवत आहेत. एकूणच बीज गुणन केंद्राचा दिव्याखाली अंधार असाच प्रकार सुरु आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रकल्प या गुणन केंद्रात कार्यान्वित झालेल्या नाही. परिणामी सदर बीज गुणन केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे.
येथे ६५ एकरांचा शेतीचा ओलिताखाली भूखंड आहे. यात धान मळणी यंत्र, गांढूळ खत प्रकल्प, ट्रॅक्टर, थ्रेशर असे अनेक प्रकल्प आहेत. परंतु कृषी विभागाच्या गलथान कारभाराने येथे बारमाही व रोवणी करणारे, निंदा काढणारे, धान कापणारे व इतरही काम करणारे मजुरांना दोन वर्षापासून मजुरी मिळाली नाही .ट्रॅक्टरचे भाडे मिळत नाही. त्यामुळे या तालुका बीज गुणन कृषी केंद्रात काम करायला मजूर मिळत नाही. त्यामुळे दोन वर्षापासून ६५ एकर शेती शासनाला पडीत ठेवावी लागते. ६५ एकर शेतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून आणि यावर्षीही कोणत्याही प्रकारची पेरणी करण्यात आलेली नाही. जिकडे तिकडे गवत उगवले आहे. त्यामुळे पहेला येथील सर्व गुरे या बीज गुणन कृषी केंद्रात दिवसभर फिरत दिसतात. एकंदरीत हे केंद्र गुरे चारण्याचे साधन ठरत आहे. पूर्वी या केंद्रात ६५ एकर शेतीला लोखंडी अँगलचा तारेचा कंपाऊंड होता. परंतु दोन वर्षात अनेक चोरट्यांनी येथील कंपाऊंडचे लोखंडी अँगल कापून नेले. परंतु कृषी विभागाने याची साधी दखल घेतली नाही. उलट यावर्षी सिमेंट खांबाचे कंपाउंड करण्याचे काम सुरु केले. पडीत शेतीला कंपाउंड करण्यापेक्षा आधी मजुरांचे वेतन दिले असते तर यावेळी मजूर पुन्हा कामावर आले असते. परंतु मजुरांची मजुरी देऊन अधिकाऱ्यांना पैसे मिळाले नसते. त्यामुळेच सिमेंट खांबाचे कंपाउंडचे काम सुरु केले व शेती पडीत ठेवली.
याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या केंद्रात असलेल्या झाडांचीही पडक्या भावात विक्री करण्यात आल्याची चर्चा आहे. या कृषी केंद्रातील सर्वच कामे आलबेल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसत असली तरी चित्र मात्र वेगळेच आहे.
विविध समस्याने ग्रासलेल्या या तालुका बीज गुणन केंद्राकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे आणि ६५ एकर शेतीशासनामार्फत जर करीत नसतील तिचे तुकडे पाच पाच एकर शेती ठेक्याने द्यावे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Seed multiplication center in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.