आमदारपद दुसऱ्यांदा ग्रामीण भागाकडे
By Admin | Updated: October 21, 2014 22:46 IST2014-10-21T22:46:54+5:302014-10-21T22:46:54+5:30
तुमसर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेपेक्षा इतर पक्षांतील कमकुवत उमेदवारामुळेच भाजपला ही जागा पुन्हा खेचून आणता आली.ग्रामीण कार्यकर्त्यांनीच मोर्चा सांभाळला होता. तुमसर शहरात

आमदारपद दुसऱ्यांदा ग्रामीण भागाकडे
तुमसर : तुमसर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेपेक्षा इतर पक्षांतील कमकुवत उमेदवारामुळेच भाजपला ही जागा पुन्हा खेचून आणता आली.ग्रामीण कार्यकर्त्यांनीच मोर्चा सांभाळला होता. तुमसर शहरात शेवटच्या दिवसाला मुसंडी मारल्याने भाजपचे चरण वाघमारे मताधिक्याने निवडून आले. दुसऱ्यांदा ग्रामीण भागातील उमेदवार आमदारपदी निवडून आले आहेत.
तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार इच्छुकांची संख्या मोठी होती. जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांनी अशी फिल्डींग लावली होती. सन २००९ मध्ये काँग्रेसमध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असे कार्ड दिल्लीत फेकले व ऐनवेळेवर तिकीट बदलवून अनिल बावनकर यांना देण्यात आली या खेपेला भाजपच्या एका गटाने तोच कार्ड फेकला.
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात तेली समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी नंतर टप्प्याटप्प्याने दूर करण्यात आली. चरण वाघमारे यांनी प्रत्येक बाबींवर बारीक नजर केंद्रीत केले होते. त्यांच्या लेबल लागू नये याची त्यांनी शेवटपर्यंत खबरदारी घेण्यात आली होती. त्यांच्या सोबत नेहमीच इतर समाजाचे नेते व कार्यकर्ते हमखास फिरत तुमसर शहरात तेली समाजाची गठ्ठा मते आहेत. शेवटच्या टप्प्यात वाघमारे यांनी समाजाचा येथे कार्ड फेकल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील इतर उमेदवारांची गोची होऊ न अल्प मतदानावर समाधान मानावे लागले. चरण वाघमारे यांच्या रुपाने तुमसरची जागा मोहाडी तालुक्यात आणि तीही ग्रामिण भागात पोहोचली आहे. (तालुका प्रतिनिधी)