सिल्ली येथे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:04+5:302021-04-24T04:36:04+5:30
भंडारा : तालुक्यातील सिल्ली येथे कोव्हॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस आज शुक्रवार दि. २३ एप्रिल रोजी देण्यात आला असून, सदर ...

सिल्ली येथे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस
भंडारा : तालुक्यातील सिल्ली येथे कोव्हॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस आज शुक्रवार दि. २३ एप्रिल रोजी देण्यात आला असून, सदर लसीकरणाचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांची बेफिकीरवृत्ती त्याला कारणीभूत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध लावल्यानंतरही नागरिक नियमांना पायदळी तुडवत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी यावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगाने सिल्ली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येत असून, सदर कोव्हॅक्सिन लसीकरणाच्या दुसऱ्या मोहिमेत आतापर्यंत ४० व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला. सदर मोहिमेत डॉ. रेवाकांत गभणे, आरोग्यसेविका चंदा झलके, पद्मा घटारे, एम.एम. शेख, एस.एस. चेटुले, आशावर्कर मीनाक्षी साखरवाडे, संगीता बावनकुळे, शालू क्षीरसागर, दुर्गा भुरे, रंजना बावनकर व शालू उरकुडे आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सेवा दिली