शाळा महाविद्यालयाला सील

By Admin | Updated: March 3, 2016 00:42 IST2016-03-03T00:42:55+5:302016-03-03T00:42:55+5:30

तुमसर नगरपरिषदेने थकीत करवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याचा फटका बुधवारी शाळेसह एका महाविद्यालयाला बसला. दोन्ही शैक्षणिक संस्था बुधवारी पालिकेने सील केले.

Seal the school college | शाळा महाविद्यालयाला सील

शाळा महाविद्यालयाला सील

तुमसर नगरपरिषदेची कारवाई : प्रकरण थकीत कराचे, गुरुवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा, आंदोलनाची शक्यता
तुमसर : तुमसर नगरपरिषदेने थकीत करवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याचा फटका बुधवारी शाळेसह एका महाविद्यालयाला बसला. दोन्ही शैक्षणिक संस्था बुधवारी पालिकेने सील केले. गुरुवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत आहेत. शैक्षणिक संस्थेवर प्रथमच कारवाई करण्यात आली, हे विशेष.
तुमसर शहरात थकीत कराचे अनेक प्रकरणे आहेत. करवसुली नाही तर विकासात्मक कामांना अनुदान नाही असा पवित्रा शासनाने घेतला आहे. नगरपरिषदेची आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात सध्या थकीत कर अभियानाचा धडाका सुरु आहे. बुधवारी दुपारी मुख्याधिकारी गुल्हाने कर वसुली पथकाचे वरिष्ठ निरीक्षक वहीद खान व पथकाचे सदस्य शहरातील श्रीराम नगरात तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या गोदाम परिसरात दाखल झाले. प्रथम त्यांनी गोदाम सील केले. नंतर संस्थेच्या इमारतीत साई कला, वाणिज्य महाविद्यालय भाड्याने आहे. त्या इमारतीला पथकाने सिल केले. या संस्थेकडे पालिकेचे ७७,६२८ रुपये थकीत आहे. महाविद्यालयाचे संचालक किशोर चौधरी यांनी या कारवाईस विरोध केला. परंतु पथकाने सील ठोकले. गुरुवारपासून विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गौतमनगरात विशाल विद्यालय सुरु आहे. या शाळेवर सन २००५ पासून आतापर्यंत १२.५२ लाख रूपयांचे कर थकीत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या शाळेला बुधवारी सील ठोकले. या शाळेतही विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. शाळा महाविद्यालयावर नगरपरिषद प्रशासनाने प्रथमच कारवाई केली. जिथे शाळा महाविद्यालये (शैक्षणिक संस्था), रुग्णालये तथा सार्वजनिक हितांच्या संस्था मालकीच्या अथवा भाड्याने असल्या तरी प्रशासनातर्फे कारवाई सहसा होत नाही, परंतु तुमसर नगर परिषदेने तात्काळ कारवाई केली हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seal the school college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.