साकोली तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ
By Admin | Updated: August 11, 2016 00:25 IST2016-08-11T00:25:05+5:302016-08-11T00:25:05+5:30
तालुक्यातील अनेक गावात बिबट्याची भिती निर्माण झाली. त्यामुळे गावकरी रात्री पहारा देत आहेत.

साकोली तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ
पाळीव जनावरांची शिकार : गावकरी त्रस्त अन् अधिकारी मस्त
साकोली : तालुक्यातील अनेक गावात बिबट्याची भिती निर्माण झाली. त्यामुळे गावकरी रात्री पहारा देत आहेत. या बिबट्यांनी गावातील अनेकांच्या कोंबड्या व शेळ्या खाल्ल्या. याबाबत वनविभागाला तक्रार करूनही वनविभाग या बिबट्याला पकडू शकले नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण नागरिक त्रस्त अन् वनअधिकारी मस्त अशी स्थिती पहावयास मिळत आहे.
साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक, बरडकिन्ही, किटाळी, गिरोला या जंगलव्याप्त गावात दररोज बिबट्याचा शिरकाव होत आहे. मागील आठवड्यापासून दररोज गावात शेळ्या व कोंबड्यांची बिबट्याकडून शिकार होत आहे. मुंडीपार सडक, बरडकिन्ही, किटाडी व गिरोला ही गावे साकोली तालुक्यात येत असली तरी वनविभागाचे क्षेत्र मात्र लाखनी आहे. नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी तक्रार दिली असली तरी वनाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. (तालुका प्रतिनिधी)