लाखनी येथे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:26+5:302021-03-06T04:33:26+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून नेफडोचे अध्यक्ष अशोक वैद्य, गजानन गभने, पंकज भिवगडे, दिलीप भैसारे, प्रमोद दळवी उपस्थित होते. यावेळी पक्षिविज्ञान, ...

Scientific Approach Awareness Week at Lakhni | लाखनी येथे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती आठवडा

लाखनी येथे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती आठवडा

प्रमुख पाहुणे म्हणून नेफडोचे अध्यक्ष अशोक वैद्य, गजानन गभने, पंकज भिवगडे, दिलीप भैसारे, प्रमोद दळवी उपस्थित होते.

यावेळी पक्षिविज्ञान, खगोलविज्ञान, सर्पविज्ञान तसेच निसर्गविज्ञान यावर माहिती देण्यात आली. जादूटोणाविरोधी कायदा यावर मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण केले. यात स्कायवर्ड स्कूल छविल रामटेके याने तयार केलेल्या सॅनिटायझर मशीनला प्रथम क्रमांक, समर्थ विद्यालयातील हरीश सेलोकरच्या पंखा प्रयोगाला द्वितीय क्रमांक, तर वैभव सुखदेव मस्के याच्या सोलर पॅनलला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. लहान गटात एमडीएन फ्युचर स्कूलच्या अर्णव अशोक गायधने याच्या देवयानी गॅलेक्सी व आकाशगंगा यामधील संभाव्य टक्कर या खगोल मॉडेलला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. अशोक गायधने, तर आभार दिलीप भैसारे यांनी मानले. यशस्वितेसाठी छविल रामटेके, आर्यन धरमसारे, हरीश सेलोकर, प्रज्वल भांडारकर, गौरेश निर्वाण, साहिल निर्वाण, अमर रामटेके, दीप रामटेके, कार्तिक सेलोकर, आयुष राघोर्ते, वैभव मस्के, अर्णव गायधने, ओम आगलावे, आरू आगलावे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Scientific Approach Awareness Week at Lakhni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.