शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात खराब रस्त्यांमुळे स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली; एक गंभीर, व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:14 IST

व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी, पाच जखमी : विद्यार्थ्याची बास्केट स्टिअरिंगवर आदळली अन् घडला अनर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / खमारी : तालुक्यातील बेरोडी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास निघालेली व्हॅन भिलेवाडा ते खमारी मार्गावरील सुरेवाडा पुनर्वसन गावाशेजारील पुलावरून १० फूट खाली कोसळली. या अपघातात एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली, तर ५ किरकोळ जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास घडला.

गंभीर जखमी विद्यार्थ्यांचे नाव गर ईश्वर मेश्राम (७, माटोरा) असे असून दाखल असलेल्या अन्य जखमींमध्ये अन्वेश दीपक बेदरकर (५, मांडती), सान्वी दीपक बेदरकर (६, मांडवी), अन्वेश भोयर (६, माटोरा), सानिध्या रामप्रकाश चोपकर (७, खमारी), रुद्राणी उमेश बेदरकर (७, मांडवी) यांचा समावेश आहे. वाहनचालक महेश पंजाब मेश्राम (२८, मांडवी) याच्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. या अपघातग्रस्त व्हॅनमध्ये ५ ते १० वयोगटातील १३ विद्यार्थी होते. अन्य विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याने त्यांना पालक आपल्यासोबत घेऊन गेले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई कॉन्व्हेंटच्या संचालकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व्यवस्थापनाकडून व्हॅनची व्यवस्था केली होती. त्याचे दरमहा भाडे पालक देत आहेत. दुपारी १:३० वाजता सुटी झाल्यावर या एमएच ४९ बीबी ५८६४ क्रमांकाच्या व्हॅनमधून मांडवी, माटोरा व खमारी गावातील १३ विद्यार्थी गावाकडे निघाले होते. चालक महेश पंजाब मेश्राम (२८, मांडवी) होता. दरम्यान सुरेवाडा पुलाजवळ खोल खड्डे असल्याने भरधाव वेगातील वाहन उसळले. चालकाच्या बाजूला बसलेल्या एका विद्यार्थ्याची बास्केट स्टेअरिंगला आदळली. मुले व बास्केट सांभाळण्याच्या प्रयत्नात वाहन अनियंत्रित झाले व काही कळण्याच्या आत वाहन मुख्य पुलाआधी असलेल्या सुरक्षा भिंतीचे अवरोधक तोडून १० फुट खोल कोसळले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ठाणेदार घटनेची माहिती मिळताच कारधा गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

पालकांत आक्रोश, शिक्षक चिंतेत

घटनेची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक व पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात एकच गर्दी दिसून आली. मुलांची चिंताजनक स्थिती पाहून पालकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी शिक्षकांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून आला.

"मुलांना घेऊन वाहन चालवित असताना पुलाआधी असलेल्या खड्यांमुळे वाहन उसळले. एका मुलाची बास्केट स्टेअरिंगला आदळली. मुले व बास्केट सांभाळण्याच्या प्रयत्नात वाहन पुलावरून खाली कोसळले."- महेश पंजाब मेश्राम, व्हॅन चालक.

English
हिंदी सारांश
Web Title : School van crashes off bridge in Bhandara; 13 students injured.

Web Summary : A school van carrying 13 students crashed off a bridge near Bhandara due to poor road conditions. One student is seriously injured, and five others sustained minor injuries. The driver lost control after hitting potholes.
टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक