गैरमार्गाविरूद्ध लढ्याचा शाळेत संस्कार
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:35+5:302015-02-11T00:33:35+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये यासाठी परीक्षेपूर्वी शाळेत ...

गैरमार्गाविरूद्ध लढ्याचा शाळेत संस्कार
मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये यासाठी परीक्षेपूर्वी शाळेत होणाऱ्या सराव परीक्षेत गैरमार्गाविरूद्ध लढ्याचा महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेत संस्कार दिले जात आहे.
राज्य शिक्षण मंडळाने परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून भरारी पथके, बैठी पथके नेमली जातात. व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. तरीही परीक्षेत गैरप्रकारांना पाहिजे त्या प्रमाणात आळा बसलेला नाही. ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगावदेवीच्या शाळेत कॉपीचे आयुष्यावरील दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजून देण्याचा संस्कार सातत्याने केले जाते. शाळा अंतर्गत दहाविच्या सहा सराव परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा दरवर्षी १ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी या कालावधीत मंडळाच्या धर्तीवर घेतल्या जाते. सराव परीक्षा घेण्याच्या माध्यमातून विद्यार्थी तयार होतात असा अनुभव शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी सांगितले. तथापि विद्यार्थी इंग्रजी व गणित या विषयाला घाबरत असल्याचे निर्दशनास आले. मागील सात वर्षापासून गणित व सायंस या विषयांचे तीन शिक्षकांची कमतरता असतानाही आठवड्यात मुख्याध्यापकांसह शिक्षकांना प्रत्येकी ५२ तासिकेचा बोझा उचलावा लागतो. या विपरीत परिस्थितीचा सामना करीत विद्यार्थ्यांना सरावातून घडविण्याचे कार्य सहायक शिक्षक हंसराज भडके, धनराज वैद्य, हेमराज राऊत, शोभा कोचे, गजानन वैद्य ही टीम करीत आहे. शाळेकडून घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा मंडळाच्या धर्तीवर घेण्यात येत असल्याने शाळेतच दहावी सराव परीक्षेत कॉपीमुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या स्तुत्यउपक्रमाची प्रशंशा शिक्षणाधिकारी माध्यमिक के.झेड. शेंडे, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)