शाळा प्रशासनाचे ‘ते’ अतिक्रमण जमीनदोस्त
By Admin | Updated: March 3, 2017 00:41 IST2017-03-03T00:41:06+5:302017-03-03T00:41:06+5:30
शहरातील विदर्भ हॉऊसिंग कॉलनीत असलेल्या संत शिवराम शाळेच्या प्रशासनाने रेल्वे लाईनला लागून असलेल्या

शाळा प्रशासनाचे ‘ते’ अतिक्रमण जमीनदोस्त
दणका लोकमतचा : नगर पालिका प्रशासनाने केली कारवाई
भंडारा : शहरातील विदर्भ हॉऊसिंग कॉलनीत असलेल्या संत शिवराम शाळेच्या प्रशासनाने रेल्वे लाईनला लागून असलेल्या नाल्यावर सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू केले होते. याची तक्रार येथील रहिवाश्यांनी केली होती. या संबधीचे वृत्त ‘लोकमत’ने १९ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. याची दखल घेत भंडारा नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नाल्यावर होत असलेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
विदर्भ हॉऊसिंग कॉलनीत संतशिवराम शाळा आहे. शाळा व्यवस्थापनाने नाल्यावर अतिक्रमण करून सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू केले होते.
दुसरीकडे विदर्भ हाऊसिंग कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या बळावली आहे. सदर बांधकाम थांबवून शाळा प्रशासनाने नियमाने बांधकाम करून जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. याची दखल घेत नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. यात अतिक्रमण पथकातील कर्मचारी आनंद मिश्रा तथा मिथून मेश्राम यांनी जेसीबीच्या साह्याने रेल्वे लाईन परिसराला लागून असलेल्या नाल्यावर होत असलेल्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम जमिनदोस्त केले. सदर कारवाई सायंकाळी ६ वाजतापर्यंत सुरू होती, अशी माहिती आनंद मिश्रा यांनी दिली. (प्रतिनिधी)