‘त्या’ शिक्षकावर शाळा व्यवस्थापन करणार कारवाई?
By Admin | Updated: December 26, 2016 00:55 IST2016-12-26T00:55:20+5:302016-12-26T00:55:20+5:30
युवतीला प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या धिरज खाटीक या शिक्षकाला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.

‘त्या’ शिक्षकावर शाळा व्यवस्थापन करणार कारवाई?
प्रकरण युवतीवर अत्याचाराचे : शैक्षणिक वर्तुळात खळबळ
भंडारा : युवतीला प्रेमजाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या धिरज खाटीक या शिक्षकाला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हा शिक्षक शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयात कार्यरत असून शाळा व्यवस्थापन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे समजते.
शहरातील संत तुकडोजी वॉर्डातील धिरज पांडुरंग खाटीक हा शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आहे. त्याचे वॉर्डातीलच एका ३३ वर्षीय युवतीशी मागील काही वर्षांपासून पे्रमसंबंध होते. यातून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र कालांतराने त्याने तिला धोका देवून तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. दरम्यान त्याचे विवाह अन्य एका युवतीशी जुळल्याची माहिती सदर युवतीला होताच तिने धिरजने फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलिसात दिली. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
युवतीच्या तक्रारीवरुन आता भंडारा पोलीस सदर शिक्षकाचे कपडे हस्तगत करणार असून धिरजने सदर युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेल्या स्थळी नेऊन चौकशी करणार असल्याची माहितीही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी ‘लोकमत’ ला दिली.
नानाजी जोशी महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्तुळात मोठी ख्याती आहे. अश्या नामांकित संस्थेतील धिरजच्या दुष्कृत्यामुळे संस्था बदनाम होत आहे. त्यामुळे धिरजवर शाळा व्यवस्थापन समिती कारवाई करणार असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)
रिपाई सेना, दलित संघटनेचा इशारा
धिरज खाटीक या शिक्षकाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडीत युवती ही दलित समाजाची आहे. त्यामुळे अशा शिक्षकावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, त्याला जमानत मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने भूमिका वठवावी व पीडीत मुलीला न्याय दयावा अशी मागणी रिपब्लिकन सेना व दलित संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांनी दिला आहे.