बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल

By Admin | Updated: July 23, 2014 23:28 IST2014-07-23T23:28:47+5:302014-07-23T23:28:47+5:30

राज्य शासनाच्या माध्यमातून भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र लता युवराज सुर्यवंशी या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती

The scholarship is based on fake signature | बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल

बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल

मासळ : मासळ: राज्य शासनाच्या माध्यमातून भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र लता युवराज सुर्यवंशी या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती बनावट स्वाक्षरीच्या आधारे उचल केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली.
भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांचे शिक्षण योग्यप्रकारे व्हावे यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना अमलात आणली आहे. यातीलच आम आदमी विमा योजनेअंतर्गत सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून प्राप्त होते.
मासळ येथील सुबोध विद्यालयात सन २००८-२००९ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या लता सुर्यवंशी या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी संगणकीकृत पद्धतीने अर्ज सादर केला होता. यानुसार एलआयसी कार्यालयाने तिला ६०० रुपयाची शिष्यवृत्ती मंजूर केली. मात्र याबाबत तहसील कार्यालय लाखांदूर येथे चौकशी केली असता तिची बनावट स्वाक्षरी करुन पैशाची उचल केल्याचे उघडकीस आले.
यावरुन या शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती खऱ्या लाभार्थ्यांना मिळतेच याचा नेम नाही. त्यामुळे या योजनेतील शिष्यवृत्ती प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गात करण्यात येत आहे (वार्ताहर)

Web Title: The scholarship is based on fake signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.