जिल्ह्यात ‘प्लेटलेटस्’चा तुटवडा
By Admin | Updated: November 29, 2014 00:39 IST2014-11-29T00:39:33+5:302014-11-29T00:39:33+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाने उच्छाद मांडला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

जिल्ह्यात ‘प्लेटलेटस्’चा तुटवडा
भंडारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाने उच्छाद मांडला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ६२ रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यातील सहा रुग्णांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे निष्पन्न झाले. असे असतानाही जिल्ह्यात प्लेटलेट्सचा तुटवडा असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. असे असले तरी सामान्य रुग्णालय प्रशासनाने प्लेटलेट्सची गरज भासली नसल्याचे म्हटले आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात आॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या १२१ रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील ८८ रग्णांची रक्तजल नमुने तपासणी करण्यात आले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील २८ रूग्णांना नागपूरला हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ९३ रूग्णांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत एप्रिल ते आॅक्टोंबरपर्यंत ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यातील ६२ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
भंडारा जिल्ह्यात आॅक्टोंबर अखेरपर्यंत डेंग्यूची लागण झालेल्या सहा रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागात करण्यात आली आहे. हिवताप विभागाने आॅक्टोबर महिन्यात २४ रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शरिरातील प्लेटलेट्स कमी होत असल्याने डेंग्यूची लागण होते.
साधारण व रक्तस्त्राव असे दोन डेंग्यूची लक्षणे आहेत. १.५० लाखांवर प्लेटलेट असले तर प्रकृती ठणठणीत आहे, असे मानले जाते. मात्र ५० हजारांवर ते घसरल्यास डेंग्यूची लागण संभवते. जिल्ह्यात सध्यास्थितीत डेंग्यू नियंत्रणात असला तरी एखाद्यावेळी आवश्यकता भासल्यास रूग्णाच्या नातेवार्इंकासमोर संकट उभे राहू शकते. (शहर प्रतिनिधी)