सेवाभावी सरसावले, प्रशासन माघारले

By Admin | Updated: August 6, 2014 23:40 IST2014-08-06T23:40:04+5:302014-08-06T23:40:04+5:30

सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यानंतर शेकडो गावांना क्षति पोहोचली. अनेक कुटूंब बेघर झाले. या कुटुंबांसाठी सेवाभावी संस्था सरसावल्या असल्या तरी या बेघर कुटुंबांच्या

Sawantwadi, the administration has withdrawn | सेवाभावी सरसावले, प्रशासन माघारले

सेवाभावी सरसावले, प्रशासन माघारले

भंडारा : सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यानंतर शेकडो गावांना क्षति पोहोचली. अनेक कुटूंब बेघर झाले. या कुटुंबांसाठी सेवाभावी संस्था सरसावल्या असल्या तरी या बेघर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप पुढाकार घेतलेला नाही. आम्हाला घरकुल मिळणार की नाही? हा आपादग्रस्तांचा प्रश्न संत्रस्त करणारा आहे. दरम्यान, मदतीत प्रशासन माघारल्यामुळे स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थंनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
सिंदपुरी या तीन हजार लोकवस्तीच्या गावापासून एक कि़मी. अंतरावर उत्तरेला मालगुजारी तलाव आहे. हा तलाव पहाटेच्या सुमारास तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावाची पाळ गावाच्या दिशेकडून फुटली आणि पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने वाहू लागला, अतिवृष्टी व पहाटेची वेळ असल्याने ग्रामस्थ साखरझोपेत होते. पाण्याच्या लोंढा पश्चिमेकडील शेतातून आला. चांदपुरकडे जाणाऱ्या मार्गावर तीन फूट पाणी होते. काही ग्रामस्थ पहाटे उठल्यावर त्यांना अंगणात पाणीच पाणी दिसले. त्यानंतर आरडाओरड सुरु होताच संपूर्ण गाव जागे झाले. काय करावे, कुणालाही काहीच कळेना, गावातील मोतीलाल ठवकर यांनी सभापती कलाम शेख यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यांनी गावातील काही लोकांना मदतीला घेऊन तलावाची विरुद्ध दिशेची पाळ फोडण्यासाठी सरसावले. तोपर्यंत सखल भागात पाणी साचले होते. सकाळी संपूर्ण गाव उपाशी होते. दुपारनंतर सेवाभावी संस्थांनी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली. त्यानंतर समाजमंदीर व विष्णू मंदिरात, काहींनी कुंदन बोरकर यांच्या वाड्यात आश्रय घेतला.
लहान मुलांचा टाहो
या कुटूंबातील लहान मुले आपल्या आई वडिलांना भोजन द्या, भोजन असा टाहो फोडत होते. या संकटाच्यावेळी सेवाभावी संस्था पुढे आल्या. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली होती. अन्न धान्याचे वाटप येथे झाले नाही. अधिकारी येथे भेट देण्याकरिता आले. सर्व्हेक्षण केले, लाभार्थ्यांची यादी तयार केली. काहींना खावटी म्हणून २,५०० ते ३००० हजाराचा धनादेश दिला. खरी मदत अन्नधान्याची होती. ती पुरविण्यात आली नाही. सभापती शेख यांनी मंदिरातील आश्रीत ग्रामस्थांना अन्नधान्याची व्यवस्था केली. त्यानंतर तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तांदळाची मदत केली. यावेळी तहसीलदार व तलाठी उपस्थित नव्हते. येथे दररोज तलाठ्याने प्रशासनाला माहिती देण्याची गरज आहे, परंतु दररोज तलाठी गावात येत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दोन विभाग आमने सामने
तलाव नादुरूस्त असून तलावाची मालकी निश्चित कुणाची आहे, हे अधिकाऱ्यांनाच माहित नाही. जिल्हा परिषद व लघु पाटबंधारे स्थानिक स्तर या विभागातील अधिकाऱ्यांची गावातच ग्रामस्थांसमोर जुंपली होती. हा तलाव लघुपाटबंधारे विभाग स्थानिकस्तर या विभागाकडे वर्ग करण्यात आला. परंतु दुरूस्तीकरिता निधीचा नाही केवळ वर्ग करून फायदा काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.येथे चारही गेट नादुरूस्त असल्याची आहे. एकापाठोपाठ चार गेट फुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता.

Web Title: Sawantwadi, the administration has withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.