सावित्रीच्या लेकींनाे, स्पर्धेत उतरायला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:27+5:302021-01-20T04:34:27+5:30

लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. ...

Savitri's lakes, learn to compete | सावित्रीच्या लेकींनाे, स्पर्धेत उतरायला शिका

सावित्रीच्या लेकींनाे, स्पर्धेत उतरायला शिका

Next

लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका गीता बोरकर होत्या. कार्यक्रमाला शिक्षिका प्रेरणा कंगाले, प्रियांशी मेश्राम उपस्थित होते. यावेळी चित्रकला स्पर्धेतील अपूर्वा ढेंगे, वैष्णवी वाडीभस्मे, रुचिता रोकडे व निबंध स्पर्धेतील रोहिणी गिरीपुंजे, रवीना रोकडे, चारू दोनोडे, सुहानी कामथे, अचल मडामे, आकांक्षा लांजेवार, गोमती गिरीपुंजे, वैष्णवी वाडीभस्मे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापिका गीता बोरकर यांनी सावित्रीबाईंच्या व माँ जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर माहिती देऊन आजच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. सावित्रीबाईंनी अत्यंत कठीण काळात दगड-गोटे झेलत स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. संचालन शिक्षिका प्रेरणा कंगाले यांनी केले, तर आभार प्रियांशी मेश्राम यांनी मानले.

Web Title: Savitri's lakes, learn to compete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.