सराफा व्यावसायिकांचा मोहाडी बंद कडकडीत
By Admin | Updated: March 5, 2016 00:40 IST2016-03-05T00:40:52+5:302016-03-05T00:40:52+5:30
शासनाद्वारे सराफा व्यावसायिकांवर सेंट्रल एक्साईज ड्युटी कर लादल्याने तालुक्यातील सराफा व्यावसायिकांत असंतोष व्याप्त आहे.

सराफा व्यावसायिकांचा मोहाडी बंद कडकडीत
मोहाडी : शासनाद्वारे सराफा व्यावसायिकांवर सेंट्रल एक्साईज ड्युटी कर लादल्याने तालुक्यातील सराफा व्यावसायिकांत असंतोष व्याप्त आहे. शासनाच्या या अन्यायकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोहाडी-तुमसर स्वर्णकार असोसिएशनतर्फे २ मार्च ते ४ मार्च पर्यंत तीन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात आला.
काही दिवसांपूर्वी दोन लाख रूपयांच्या ज्वेलरी खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आला होता. तेव्हाही सराफा व्यावसायिकांनी एका दिवसाचा बंद पाळून शासनाप्रती असंतोष व्यक्त केला होता.
स्वर्णकार असोसिएशन तुमसर-मोहाडीचे अध्यक्ष गौरीशंकर कारेमोरे यांनी सांगितले की जर शासनाने व अन्यायकारी सेंट्रल एक्साईज ड्युटी डिपार्टमेंट कायदा हटविला नाही तर पुढे बेमुदत बंद पुकारण्यात येईल. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सामान्य जनतेपासून ते उच्चवर्गीयांना सुद्धा दागदागीन्यांची आवश्यकता असते.
अशा वेळेस सराफा व्यावसायीकांनी जर बेमुदत बंद पुकारला तर सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. मोहाडी येथे सराफा प्रतिष्ठान बंद ठेवण्यासाठी राजन सिंगनजुडे, समिर धार्सेकर, सुशील गुरव, मनोज पोटभरे, नरेश दिपटे, दिनेश ढोमणे, जयंत गुरव, घनश्याम पुंडे, दिपटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)