सातोना-नेरी मार्ग ठरतोय मृत्यूमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:26+5:30
सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्याने दुचाकी चारचाकी जड वाहनांच्या वर्दळीमुळे पहिला थरच उखडून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

सातोना-नेरी मार्ग ठरतोय मृत्यूमार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सातोना ते नेरी रस्त्याच्या डांबरीकरण कामाला मागील दोन महिन्यापासून सुरूवात झाली असली तरी सदर रस्त्यावरील पहिला थर रहदारीच्या वर्दळीमुळे उखडू लागला असून रस्त्यावर बारिक चुरी अस्ताव्यस्त पडली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक सायकलस्वार, दुचाकी चालक रस्त्यावर अपघाताने पडत असल्याची प्रवाशी, नागरिकांची ओरड होत आहे. याकडे संबंधित विभागाने ३१ डिसेंबरपूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा सातोनाचे माजी सरपंच राजेश हटार यांनी दिला आहे.
सातोना ते नेरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी बांधकाम यंत्रणेने मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवत केली आहे. पहिल्या थराचे काम करण्यात आले आहे मात्र नंतरचे काम करण्यास अतिविलंब झाल्याने दुचाकी चारचाकी जड वाहनांच्या वर्दळीमुळे पहिला थरच उखडून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आणलेली गीट्टी व बारीक चुरी रस्त्याच्या बाजूलाच अस्ताव्यस्थ पडली आहे. त्यामुळे सायकलस्वार व दुचाकी चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहेत. अपघातांच्या घटना मागील दोन महिन्यापासूनवाढल्या असल्या तरीही रस्त्याच्या कामाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून रस्त्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. नागरिक, प्रवाशांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून सबंधित कंत्राट यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.