शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसाने रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 23:00 IST

प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली आहे. ६३ जलाशय तुडुंब भरले असून, सरासरी ९५ टक्के जलसाठा या प्रकल्पांमध्ये आहे. तर चार मध्यम प्रकल्पांत ९५.५६७ टक्के जलसाठा झाला असून, ४०.९१७ दलघमी साठा आहे.यावर्षी वरुणराजा शेतकऱ्यांवर प्रसन्न असल्याचे दिसत आहे. सुरुवातीपासून सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सिंचन विभागाच्या ९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या मध्यम प्रकल्पात ९५.५६७ टक्के जलसाठा आहे. सध्या या प्रकल्पात ४०.९१७ दलघमी पाणी आहे. त्यात बघेडा प्रकल्पात ४.५३५ दलघमी जलसाठा असून, हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. चांदपूर मध्यम प्रकल्पात सध्या ९४.६२६ टक्के, बेटेकर बोथलीमध्ये ९५.१९९ टक्के आणि सोरणा प्रकल्पात ९७.०३६ टक्के जलसाठा आहे.प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.

२८ मामा तलाव झाले तुडुंब-  जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील २८ ही तलावात सध्या १०० टक्के जलसाठा आहे. या सर्व तलावांमध्ये ११६.१९ दलघमी जलसाठा असून, या प्रकल्पांची एकूण क्षमता १२१.७६ दलघमी आहे. त्या तुलनेत या प्रकल्पांमध्ये ९५.४२८ दलघमी जलसाठा आहे.

२१ लघु प्रकल्प १०० टक्के भरले

- सिंचन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ लघु प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ५ प्रकल्पांत ७५ ते ९९ टक्के आणि ५ प्रकल्पांत ७५ टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत ४९.८७३ दलघमी जलसाठा आहे. एकूण जलसाठा क्षमता ५३.५४३ दलघमी असून, त्या तुलनेत ९३.१४७ टक्के जलसाठा आहे.

भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यात सिंचन प्रकल्पाची स्थिती उत्तम आहे. सध्याही पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वप्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. मुबलक पाणी असल्याने रबी व उन्हाळी हंगामात नियोजनानुसार सिंचनासाठी पाणी सोडले जाईल.-प्रशांत गोडे,  कार्यकारी अभियंता सिंचन विभाग 

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी