साडीच्या पदराने केला महिलेचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:52 IST2018-04-01T22:52:50+5:302018-04-01T22:52:50+5:30
दूचाकीने नागपूरकडे परत जात असतांना साडीचा पदर टायरमध्ये फसला. यात महिला दूचाकीवरुन डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिती अनिरुध्द दहिवले (३६) रा. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास कारधा नवीन पुलाजवळ घडली.

साडीच्या पदराने केला महिलेचा घात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दूचाकीने नागपूरकडे परत जात असतांना साडीचा पदर टायरमध्ये फसला. यात महिला दूचाकीवरुन डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिती अनिरुध्द दहिवले (३६) रा. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास कारधा नवीन पुलाजवळ घडली.
प्रिती ही पाच वर्षांनंतर लाखनी येथे माहेरी आली होती. अनिरुध्द दहिवले हे आपल्या दुचाकीने पत्नी व तिन मुलांसह लाखनीला सासुरवाडीला आले होते. दुचाकीने जात असताना वैनगंगा नदीवरील नविन पुलाजवळ प्रिती यांचा साडीचा पदर लोंबकळत असल्याने तो दूचाकीच्या मागील चाकामध्ये गुंडाळला गेला. यात ती डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली.
दहिवले दाम्पत्याला तीन मुल आहेत. यापैकी दोन मुली व एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलगा असून तो पावणे दोन वर्षांचा आहे. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे या तिन्ही मुलांवरील आईचे छत्र हरपले आहे. छोटीशी चुक जिवावर कशी बेतू शकते याचेच हे बोलके व तेवढीच मार्मिक ही घटना ठरली.