लाखांदूर येथे संत रविदास जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:44+5:302021-03-08T04:32:44+5:30
लाखांदूर : स्थानिक लाखांदूर येथील संत शिरोमणी रविदास मंडळ व चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात ...

लाखांदूर येथे संत रविदास जयंती
लाखांदूर : स्थानिक लाखांदूर येथील संत शिरोमणी रविदास मंडळ व चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जि.प. अध्यक्ष ॲड.वसंतराव एंचीलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजप तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख अरविंद बनकर, हरीश बगमारे, मेघनाथ चौबे, रिजवान पठान, रमेश मेहेंदळे, विलास हुमने, गजानन ठाकरे, कारूजी चौबे, राधाताई मेश्राम, शहारे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संत रविदास यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन व मार्गदर्शनही केले. संचालन व प्रास्ताविक वृंदा चौबे यांनी तर आभार मेघनाथ चौबे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य चर्मकार महिला पुरुष समाजबांधव व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.