संस्कृती संवर्धनासाठी एक व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:27 IST2017-07-30T21:26:49+5:302017-07-30T21:27:16+5:30
आधुनिकतेच्या नावाखाली परंपरा, संस्कृती लोप पावत आहे. संस्कृतीचे जतन करणे, पुढच्या पिढीला जुन्या परंपरेची माहिती करणे, जबाबदारी आहे.

संस्कृती संवर्धनासाठी एक व्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधुनिकतेच्या नावाखाली परंपरा, संस्कृती लोप पावत आहे. संस्कृतीचे जतन करणे, पुढच्या पिढीला जुन्या परंपरेची माहिती करणे, जबाबदारी आहे. अन्यायाविरुद्ध चळवळ गतीमान करायची आहे. साहित्य निर्मितीतून लहान, मोठ्यांना प्रेरणा देण्याचे काम होवू शकते असे प्रतिपादन नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव व गोर बंजारा समाजाचे मुख्य संघटक श्रीराम चव्हान यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारा येथील सभागृहात गोर बंजारा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मार्गदर्शन करताना बोर्डाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांनी प्रतिपादन केले. सहविचार सभेला स्वागताध्यक्ष प्रा.मोहन चव्हाण, मनोहर चव्हाण, नरसिंग राठोड, शेषराव चव्हाण, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, डॉ. प्रकाश राठोड, दिनेश राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नागपूर येथे दुसरे अखिल भारतीय गोर बंजारा समाजाचे साहित्य संमेलन २८ व २९ आॅक्टोबर रोजी होत आहे. संमेलनाची तयारी तसेच समाजातील लोकांना संघटीत करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंजारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा.मोहन चव्हाण यांनी बंजारा बोलीभाषेला शासनाची मान्यता मिळायला हवी. सगळ्यांनी पुरातन संस्कृतीचे संवर्धन करणे महत्वाचे आहे असे म्हटले. नागपूर बोर्डाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांचे शाल, श्रीफळ देऊन शंकर राठोड व भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी सत्कार केला. यावेळी प्रमुख अतिथींनी आपले विचार प्रगट केले. बंजारा समाजातील नवोदीत लेखक, कविंना साहित्यनिर्मितीची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य साहित्य संमेलनातून होणार आहे. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन या सहविचार सभेतून करण्यात आले.
संचालन प्रकाश राठोड यांनी केले. तर आभार शंकर राठोड यांनी मानले. सभेसाठी कुणाल जाधव, विजय जाधव, विक्रम राठोड, अविनाश राठोड, हरिश्चंद्र चव्हाण, उत्तम राठोड, सुशिल चव्हाण, दिनेश राठोड, प्रकाश राठोड, उत्तम राठोड, दारासिंग चव्हाण, राम राठोड, बाळू चव्हाण, नंदकिशोर जाधव, पांडूरंग चव्हाण, सुनिल राठोड, गोकुळ राठोड, अविनाश राठोड, बंडू राठोड, नितेश चव्हाण आदींनी सहकार्य केले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.