शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

शाळा-महाविद्यालयात लावली सॅनिटरी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:31 IST

महिलांसाठी राजकारणात ५० टक्के आरक्षण आहे. यामुळे राजकारणातील सर्वोच्च पदावर महिलांची संख्या जास्त आहे. पण सत्ताधारी महिलांच्या वर्चस्वावर असलेले पुरुषी वर्चस्व निर्णयात आड येतात.

ठळक मुद्देश्वेता येळणे यांचा पुढाकार : न्यूनगंड व भीती दूर सारण्यासाठी जागृती

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : महिलांसाठी राजकारणात ५० टक्के आरक्षण आहे. यामुळे राजकारणातील सर्वोच्च पदावर महिलांची संख्या जास्त आहे. पण सत्ताधारी महिलांच्या वर्चस्वावर असलेले पुरुषी वर्चस्व निर्णयात आड येतात. पण वरठीच्या सरपंच श्वेता येळणे याबाबद अपवाद ठरल्या आहेत. महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या व समाजात गैरसमज असलेल्या मुद्यावर न घाबरता सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांच्या मदतीने गावातील शाळा-महाविद्यालयात सॅनिटरी मशीन लावण्याचा उपक्रम हाती घेतला. वरठी येथे पाच शाळा-महाविद्यालयात सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या.लवकरच उर्वरित शाळां व सार्वजनिक ठिकाणी मशीन लावण्याच्या उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सनफ्लॅग कंपनीने हिरीरीने मदत केली. महिलांच्या स्वच्छता व आरोग्याबाबद अनेक समस्या आहेत. पुरोगामी देशात आजही महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या अनेक समस्या बाबद सार्वजनिक चर्चा करता येत नाही. याबाबद अनेक गैरसमज तेवढेच मानसिक गुलामी पाहावयास मिळते. यात मुलींना येणारी मासिक पाळीचा समावेश आहे.महिलांच्या आरोग्याशी जुडलेले आहे. याकाळात महिलांना आधाराबरोबर सहानुभूतीची जास्त गरज असते. प्रत्येक महिलांच्या जीवनातील हा आवश्यक घटक आहे. पण आजही महिलाही सार्वजनिक रित्या बोलायला तयार नाहीत. मासिक पाळीचा विषय म्हणजे अतिसंवेदनशील असल्यासारखा हाताळण्यात येतो. पण यामुळे महिलांना होणार त्रास कुणीही समजून घेण्यास तयार नाही.विज्ञानाच्या युगात शिक्षित समाजही याबाबद अशिक्षित असल्यासारखे वागून महिलांची उपेक्षा करताना आढळतात.सरपंच श्वेता येळणे यांना सामाजिक कायार्ची आवड होती. सरपंच झाल्यावर ही जबाबदारी अजून वाढली. महिलांच्या समस्या व आरोग्य विषयावर साकोलीच्या सुचिता आगाशे या अनेक दिवसापासून कार्य करतात. जिल्ह्यातील महिला सरपंच व पदाधिकऱ्यांशी चर्चा करून महिलांना मासिक पाळी दरम्यान मुली व महिलांना होण्याºया त्रासाबाबद उपाय सुचवले. त्यांनी अनेक ठिकाणी मशीन लावल्याचे उदाहरण देऊन गावात ही सुविधा उपलब्द व्हावी यासाठी मदतीचे आवाहन केले. पण प्रतिसाद मिळाला नाही. राजकारणात निर्णय घेण्याच्या सर्वोच्च पदावर महिला मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. पण सुचिता आगाशे याना महिलांच्या समस्याबाबद महिलाच अनुउत्सुक असल्याचे आढळले. त्यांनी सरपंच श्वेता येळणे यांच्याशी भेटून उपक्रम समजावून सांगितले. प्रोजेक्ट तयार केला. याकरिता ग्राम पंचायत स्तरावर निधी अपुरा असल्याचे निदर्शनास आले.निधी शिवाय काम होणार नाही याची जाणीव होती. ग्राम पंचायत स्तरावर निधी नसल्याने प्रोजेक्ट पूर्ण कसा करायच्या या विवंचनेत होत्या. कोणत्याही परिस्थितीत गावात सॅनेटरी मशीन लावायच्या अशा निर्धार त्यांनी केला होता. आर्थिक मदतीसाठी त्यांनी सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापनाकडे धाव घेतली. जानेवारी महिन्यात कंपनीला प्रोजेक्ट सादर करून विषय पोटतिकडीने लावून धरला. सरपंचाची आग्रही भूमिका व निर्धार याला सनफ्लॅग व्यवस्थापनाने अपेक्षित सहकार्य करण्याचे ठरविले. सी एस आर निधीतून गावात मशीन लावण्याचा मागणी मंजूर केली. गावात पाच सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या असून याकरिता स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी योजना पूर्णत्वास नेली.येळणे यांच्या पुढाकाराने वरठी येथील सनफ्लॅग स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, नवप्रभात कन्या शाळा, स्वर्गीय पार्वतीबाई मदनकार महाविद्यालय व नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालयात मशीन लावण्यात आल्या. नुसती मशीन न लावता त्या स्वत: व सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांनी प्रत्येक शाळेत भेटी देऊन मुलीच्या मनात असलेली भीती व न्यूनगंड बाजूला सारण्यासाठी जागृती केली. सरपंच येळणे यांनी विकासाचा नवीन आदर्श राजकारण्यापुढे ठेवला आहे.