नदीतीरावर रेतीचे साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:57 IST2018-12-14T22:57:16+5:302018-12-14T22:57:31+5:30

नदीपात्रातून खनन केलेली रेती आता नदीतीरावरील गावात साठवून त्याची सोयीने वाहतूक करण्याचा फंडा रेती तस्करांनी सुरू केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदीतीरावरील गावात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे दिसून येतात. परंतु महसूल विभाग मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

Sandstones on the river | नदीतीरावर रेतीचे साठे

नदीतीरावर रेतीचे साठे

ठळक मुद्देमहसूलचे दुर्लक्ष : लिलावापूर्वीच रेतीघाटात प्रचंड खनन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नदीपात्रातून खनन केलेली रेती आता नदीतीरावरील गावात साठवून त्याची सोयीने वाहतूक करण्याचा फंडा रेती तस्करांनी सुरू केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदीतीरावरील गावात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे दिसून येतात. परंतु महसूल विभाग मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या रेतीच्या विदर्भात आणि मध्यप्रदेशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे वैनगंगेची रेती तस्करांसाठी पर्वणी ठरत आहे. मात्र यावर्षी अद्यापही जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे रेतीतस्कर चोरट्या पद्धतीने रेतीची तस्करी करीत आहे. यासाठी वैनगंगा नदीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधील रेती रात्रीच्यावेळी उत्खनन करून त्याचे नदीतीरावरील गावता डम्पिंग केले जाते. काही ठिकाणी तर आता रेतीचा उपसा करण्यासाठी बैलगाडीचा वापरही केला जात आहे. गावाजवळ असलेला रेतीचा साठा तस्कर आपल्या सोयीनुसार तिथून ट्रकद्वारे बाहेर पाठवितात. याप्रकाराला अनेक गावात विरोधही करण्यात आला. परंतु रेती तस्करांपुढे कुणाचेही चालत नाही. यासर्व प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. परंतु तेही कधी कारवाई करताना दिसत नाही.
जिल्ह्यातील पवनी, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील नदीतीरावरील गावात रेतीचे प्रचंड साठे आहेत. लाखो रूपयांची यातून उलाढाल होत आहे. परंतु रेती उत्खननाने पर्यावरणाचा ºहास होत आहे. तसेच अनेक गावातील रस्तेही या वाहतुकीने उखडले आहेत. परंतु याचे कुणालाही सोयरसुतक नाहीत. महसूल विभाग हा प्रकार उघड्या डोळ्याने पहात आहे. तलाठ्यापासून तहसीलदारांपर्यंत सर्वांनाच हा प्रकार माहिती असताना कारवाई होत नाही.

Web Title: Sandstones on the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.