रेती वाहतूकदार, अधिकाऱ्यांत वाद
By Admin | Updated: November 2, 2015 00:44 IST2015-11-02T00:44:23+5:302015-11-02T00:44:23+5:30
रेती वाहतूक करणारे ट्रक पकडल्यामुळे टाकळी येथे वाहतूकदार आणि अधिकाऱ्यांत वाद झाला. त्यामुळे वरठी मार्गावरील वाहतूक तासभर प्रभावित झाली.

रेती वाहतूकदार, अधिकाऱ्यांत वाद
टाकळी येथील प्रकार : तासभर वाहतूक प्रभावित
भंडारा : रेती वाहतूक करणारे ट्रक पकडल्यामुळे टाकळी येथे वाहतूकदार आणि अधिकाऱ्यांत वाद झाला. त्यामुळे वरठी मार्गावरील वाहतूक तासभर प्रभावित झाली. महसूल विभागाने संबंधितावर कारवाई केली. जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपल्यामुळे प्रशासनाद्वारे रेती उपसा व वाहतुकीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. या उपरही घाटांवरुन रेतीचा उपसा व वाहतूक सुरु आहे. त्यामुळे महसूल विभागाने अधिकारी व पथकाद्वारे सातत्याने लक्ष केंद्रीत केले होते.
शनिवारी सकाळच्या सुमारास टाकळी येथून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पथकाने अडविले. ट्रक चालकाची विचारपूस केली, त्यानंतर पुन्हा एक रेती वाहतूक ट्रक तेथे पोहोचला. चालक मालकांना संबंधितांचा विरोधात रस्त्यावरच वाद सुरु केला.
नायब तहसीलदारांनी नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. पंरतु वाहतूकदारांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावे असा आग्रह धरला. त्यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
तहसिलदार सुशांत बन्सोडे टाकळी येथे पोहचल्यानंतर दोन्ही ट्रक कार्यालयात लावण्याचे निर्देश दिले. त्यांनतर टाकळी येथून अधिकारी कार्यालयाकडे परतले. तोपर्यंत वरठी मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अधिकारी कार्यालयात परतताच रेती वाहतूकदार देखील तहसील कार्यालयात आले. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत काय झाले कळू शकले नाही. (नगर प्रतिनिधी)