लाखनी तालुक्यात रेती तस्करी धडाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:37+5:302021-04-07T04:36:37+5:30
दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती वाहतूकदारांकडून गरजू घरकुल लाभार्थी तसेच इतर बांधकामधारकांना मनमानी ...

लाखनी तालुक्यात रेती तस्करी धडाक्यात
दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती वाहतूकदारांकडून गरजू घरकुल लाभार्थी तसेच इतर बांधकामधारकांना मनमानी दराने रेतीची विक्री करून रेती तस्कर गरजूंची अक्षरशः लूट करीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध्य रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबवून सक्षम पथकांची निर्मिती करावी, तसेच घरकुल व इतर इमारत बांधकामासाठी वाजवी दरात रेती उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून रेतीघाटांचा लवकरात लवकर लिलाव करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
३१ मार्चपर्यंत काम करणारी पथके गायब
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मागील महिन्यातील ३१ मार्चपर्यंत रेती उत्खनन व चोरीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि संबंधित साजाचे तलाठी व कोतवाल असलेले सक्रिय फिरते पथक तयार करून कित्येक रुपयांचा महसूल गोळा केला होता. चोरट्या मार्गाने पकडलेली वाहने तहसीलला जमा केली होती. मात्र आता नवीन आर्थिक वर्षाचा एप्रिल महिना सुरू होऊनही महसूल विभागाने पथकास मुदतवाढ न दिल्यामुळे व नवीन आदेश न काढल्यामुळे सर्रासपणे पालांदूर येथील बाजार चौकातून व पोलीस ठाण्यासमोरूनच जनतेच्या रक्षकांच्या डोळ्यांदेखत संचारबंदीतही रेती तस्करांकडून रेतीची चोरटी वाहतूक सुरूच आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी रेती चोरी वाढल्याचे दिसून येत असूनसुद्धा एकीकडे रात्रीची संचारबंदी व दुसरीकडे सर्रास रेतीचोरी हे समीकरण न समजण्यापलीकडे आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.