शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:27 IST

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची थेट कारवाई : रेती माफियांना झटका!

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील बेटाळा रेतीघाट डेपोवरून रेतीचे अवैध उत्खनन करून ती टिप्परमधून नागपूरकडे गोपीवाडामार्गे घेऊन जाणाऱ्या वाहनांना वाटेतच अडवून महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात रेतीचे आठ टिप्पर पकडले. या कारवाईमध्ये ३ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्वतः हजर राहून ही कारवाई गुरूवारी रात्री ८ वाजता केली. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटांतून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. ही चोरीची रेती नागपूरला रोज टिप्परमधून नेली जाते. राष्ट्रीय महामार्गावरून न जाता शहापूर जवळील गोपीवाडा, सातोना मार्गाने नागपूरकडे ही वाहने जातात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने टिप्पर रेती घेऊन नागपूरकडे निघाल्याची गोपनीय माहितीवरून महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड घातली. 

दोन टिप्पर पसारयातील दोन टिप्परचालकांनी जवळच्या नाल्यात रेती रिकामी करून नागपूरकडे पळ काढला. पथकाच्या हे लक्षात आल्यावर त्यांचा पाठलाग करण्यात आला, मात्र ते हाती लागले नाहीत. पसार झालेल्या टिप्परची संख्या दोनपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ४९, ३(५), सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ सहकलम ७,९,१५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळाहून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रात्री ८ वाजता सुरू झालेली ही कारवाई तब्बल तीन तास चालली. रात्री ११ वाजता सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, जवाहरनगरचे ठाणेदार, एलसीबीचे पथक असे ५० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकारी सहभागी होते.

या टिप्परवर झाली कारवाईकारवाई करण्यात आलेल्या टिप्परमध्ये क्रमांक एमएच ४०/बीएफ ९१३० (चालक लक्ष्मीचंद लेंडे, ३३, रोहा बेटाळा), टीएस ०३/यूडी १०९९ (चालक प्रवीण पुरी, ३२, देवाडा बु.), एमएच ४०/सीटी ९१३० (तिन्ही मालक नितीन उर्फ मोनू गणवीर, दाभा), एमएच ३६/एए ९४५२ (चालक प्रशांत मारबते, मालक प्रदीप कांबळे, टाकळी), एमएच ४०/सीटी ८६३४ (मालक प्रवीण गणवीर, दाबा), एमएच ४०/सीएम ९४५२ (चालक मुन्ना भोयर, २७, डोडमाझरी, मालक प्रदीप कांबळे, टाकळी), एमएच ३६/एबी ३५३४ (चालक मुकेश गाढवे, ३०, रोहा, मालक अजिंक्य गोमासे, मुंढरी), एमएम ३६/एए ४३७७ (चालक पसार)

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाfraudधोकेबाजीbhandara-acभंडारा