रेती तस्कराच्या कानशिलात हाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:53+5:302021-02-15T04:31:53+5:30

साकोली : तालुक्यातील रेती घाटांवर तस्करांचा बोलबाला असतानाच एका रेतीघाट चालविणाऱ्या सहकाऱ्यानेच त्याच्याच सहकाऱ्याला कानशिलात हाणली. या प्रकरणाची शहरासह ...

The sand hit the smuggler's ear | रेती तस्कराच्या कानशिलात हाणली

रेती तस्कराच्या कानशिलात हाणली

साकोली : तालुक्यातील रेती घाटांवर तस्करांचा बोलबाला असतानाच एका रेतीघाट चालविणाऱ्या सहकाऱ्यानेच त्याच्याच सहकाऱ्याला कानशिलात हाणली. या प्रकरणाची शहरासह तालुक्यात चर्चा रंगली असून महसूल विभाग मात्र सातत्याने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या साकोली तालुक्यात अवैधपणे रेतीची तस्करी सुरू आहे. अधिकाऱ्यांनंतर आता रेतीतस्कर व रेती घाटमालक यांच्यातच आक्रोश दिसून येत आहे. परसोडीनजीकच्या पोवारटोली रेतीघाटावर सहकारीमित्रानेच सहकाऱ्याच्या कानशिलात हाणल्याची घटना घडली आहे.

सदर व्यक्ती ट्रॅक्टरमालक असल्याचीच चर्चा तालुक्यात ऐकिवात आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास नायब तहसीलदारांनी रेतीचा एक ट्रॅक्टर पकडला. तो तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आला. त्याचवेळी तेथून एक ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरसह पोबारा केला. पसार झालेल्या ट्रॅक्टरबाबत सेटिंग करण्यात आल्याची माहिती आहे.

रेती तस्करच एकमेकांची चर्चा करीत आहेत. सदर प्रकरण ताजे असतानाच पोवारटोलीतील हे प्रकरण समोर आले आहे. रविवार असल्याने अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असून रेतीची वाहतूक करण्यासाठी तस्करांनी पोवारटोली घाटाची निवड केली आहे. सदर रेतीघाट शासनाच्या आदेशानुसार लिलावप्रक्रियेत आहे. या रेतीघाटाच्या पार्टनरला अन्य लोकांनी याची माहिती दिली. हा पार्टनर तत्काळ रेतीघाटावर गेला. तसेच रेती तस्करांना रेतीची उचल करण्यास मज्जाव केला.

म्हटलेली गोष्ट एकत नसल्याने वाद उद्भवला. याउलट मुजोरी करीत रेतीघाट कसा चालविला जातो ते आम्ही पाहून घेऊ अशी दमदाटीही करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद विकोपाला पोहोचला. यात चक्क एका पार्टनरने दुसऱ्याच्या कानशिलात हाणली.

रेती तस्कारांचे रॅकेट सक्रिय

साकोली तालुक्यात रेतीघाटांची संख्या थोडीफार असली तरी रेती तस्करांचे रॅकेट मात्र चांगलेच सक्रिय आहे. याचमुळे शासनाला दरवर्षी कोट्यवधींच्या महसुलापासून वंचित राहावे लागते. कित्येक महिन्यांपासून रेतीघाटांचे लिलाव झाले नसताना तस्करांनी लाखोंची माया जमा केली आहे. त्यामुळे लिलाव झालेल्या व प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या रेतीघाटांबाबत कारवाई पूर्ण करून संबंधिताना राॅयल्टी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The sand hit the smuggler's ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.