भंगारासाठी विकल्या सलाईनच्या बॉटल्स

By Admin | Updated: December 11, 2015 00:55 IST2015-12-11T00:55:38+5:302015-12-11T00:55:38+5:30

एक्सपायरी असतानाही सलाईन बॉटल्स चिरा मारून ती नष्ट केल्यानंतर उरलेला कबाड भंगारात विकायला नेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.

Salline bottles sold for brewery | भंगारासाठी विकल्या सलाईनच्या बॉटल्स

भंगारासाठी विकल्या सलाईनच्या बॉटल्स

सावरला आरोग्य केंद्रातील प्रकार : नागरिक धडकले केंद्रावर
पवनी : एक्सपायरी असतानाही सलाईन बॉटल्स चिरा मारून ती नष्ट केल्यानंतर उरलेला कबाड भंगारात विकायला नेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. विषयाचे गांभीर्य ओळखून सरतेशेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. ही घटना काल बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सावरला प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीला आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथील परिचर मनोहर बन्सोड हे सलाईनच्या चिरा मारलेल्या १२६ बॉटल्स भंगार विक्रेत्याला विकतांनी ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. सदर बॉटल्स दवाखान्याच्या आवारात फेकलेल्या स्थितीत मिळाल्याने ते विक्री केल्याचे कबुलही केले. या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना होताच सरपंच उत्तम सावरबांधे, उपसरपंच मुरलीधर थेरे, पोलीस पाटील रविंद्र जिभकाटे, पंचायत समिती सदस्य बंडूजी ठेंगरे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णांसाठी देण्यात आलेल्या औषधी साठा मुदत असतानाही नष्ट करण्यात आला, याचा जाब विचारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण केले होते. शेकडो नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकल्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास मेश्राम यांना बोलाविले. जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी घटनास्थळी येत नाही व दोषींवर कारवाई करीत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दुपारच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डोईफोडे सावरला येथे उपस्थित झाले व ग्रामस्थांची चर्चा करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यात प्राथमिक तपासात औषधी निर्माता देवगडे यांच्या ताब्यात असलेल्या व रुग्णांकरिता वापरात न आलेल्या १२६ सलाईन बॉटल ब्लेडने चिरा मारलेल्या निव्वळ ३० रुपयात विकण्याचे प्रकरण घडल्याची कबुली दिली. यात मुदत न संपलेल्या सलाईनच्या बॉटल्सचा समावेश होता. याची मुदत जानेवारी २०१६ पर्यंत होती. सदर सलाईन बॉटल्सची मुदत संपत येत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात व साठा जास्त असल्यामुळे ते नष्ट केल्याचे स्पष्ट करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Salline bottles sold for brewery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.