विलायची, कापूरची विक्री वाढली
By Admin | Updated: February 23, 2015 01:05 IST2015-02-23T01:05:13+5:302015-02-23T01:05:13+5:30
कापूर आणि विलायची जवळ बाळगून त्याचा गंध घेत राहिल्यास स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव होऊ शकतो, अशा उपायाची चर्चा आहे.

विलायची, कापूरची विक्री वाढली
‘स्वाईन फ्लू’ : नागरिकांत भीती कायम
भंडारा : कापूर आणि विलायची जवळ बाळगून त्याचा गंध घेत राहिल्यास स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव होऊ शकतो, अशा उपायाची चर्चा आहे. त्यामुळे हा उपाय बहुतेक जण करीत असल्यामुळे किराणा दुकानांमध्ये या दोन जिन्नसांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
कडूनिंबाचा पाला वा त्याच्या काड्या, गुडवेल, निलगिरी या वस्तूंपासून बनविलेला काढा सेवन केल्यास स्वाईन फ्लूची बाधा होत नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे या वस्तूंची विक्री ही जोरात सुरू आहे.
लोकांचा कापूर आणि विलायची यांच्या मिश्रणाच्या वासावर एवढा विश्वास आहे की, बरेच जण आपल्याजवळ हे साहित्य बाळगत असल्याचे दिसून येत आहे. येथील एका डॉक्टरने सांगितले की, हल्ली बरेच जण कापूर व विलायची बाळगू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)
गर्दीत दिसू लागले मास्क
सार्वजनिक ठिकाणी या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या कारणावरून यात्रेदरम्यान गर्दीमध्ये मास्क लावून फिरत असल्याचे दिसून आले. आजाराच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असून बसमध्ये मास्क लावलेले प्रवासी दिसून आले आहेत.