शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

मध्यप्रदेशातील आयात धानाची तुमसर तालुक्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्‍या प्रतीच्या  धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो.

ठळक मुद्देस्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर विक्री

  मोहन भोयर      लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील काही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील धान विक्री केल्या जात असल्याची खळबळजनक माहिती आहे.   स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर ही विक्री होत असून  तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान गत आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर पडून आहे. तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाने यावर्षी तुमसर तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांना बोनस देण्याचीही घोषणाही केली. तुमसर तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेचर आहे. मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील धान मोठ्या प्रमाणात तुमसर तालुक्यात येणे सुरू झाले आहे. येथील येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर हा धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्‍या प्रतीच्या  धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो. तेथून बारदान्यात भरून ट्रॅक्टरने संबंधित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर तो नेण्यात येतो. त्यांच्याजवळ सदर धानाचा सातबारा असते त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र संचालक त्यांचे धान सहज घेतात. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातील धान व तुमसर तालुक्यातील धान यांच्यात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे मध्यप्रदेशतील धान कोणते आहे हे सहज ओळखता येते. परंतु या धानाची ओळख करण्यास कुणालाच वेळ नाही. मध्यप्रदेशात सर्वसाधारण धानाला भाव कमी असल्याने अनेक व्यापारी तेथुन धान खरेदी करुन भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती आधारभुत केंद्रावर विकत असल्याची माहिती आहे. याची चौकशी करणे गरजेचे आहे.

सातबारा जमा करणारी टोळी सक्रियतुमसर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले धान व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचा सातबारा त्यांच्याकडे आहे. हा सातबारा जमा करण्यात येतो. त्या मोबदल्यात त्यांना काही रक्कम देण्यात येतो. त्यामुळे सदर लहान शेतकरी आपला सातबारा या टोळीला देतात अशी माहिती आहे. सदर प्रकरणात पणन कार्यालय अनभिज्ञ असल्याचे समजते. मागील अनेक महिन्यापासून येथे असाच प्रकार सुरू आहे. परंतु अजूनपर्यंत कुठेही चौकशी आणि कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. 

त्या शेतकऱ्यांनी विकले व्यापाऱ्यांना धानमध्यप्रदेशातील धान विक्री करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सातबारा घेण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांनी आपले धान यापूर्वीच व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या सातबारावर नियमात बसवून मध्यप्रदेशातील धान येथे सहज विक्री केला जात आहे. धान विक्री करण्याचे येथे रॅकेट सक्रीय असल्याची माहिती आहे. 

मध्यप्रदेशातील धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात नाही. यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.- गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी भंडारा.तुमसर तालुक्यातील सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातील धान मोठ्या प्रमाणात येत असून त्यांची येथील सातबारावर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. संबंधित विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी. - शंकर राऊत,  अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड