शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

तुमसर बाजार समितीत शेतमालाची विक्री आता थेट वजनकाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

तुमसर बाजार समितीत तुमसर आणि मोहाडी येथील शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणतात. परंतु वेळेवर विक्री होण्याची कोणतीच खात्री नसते. आता तर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दोन महिन्यांपासून बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आहे. मात्र अचानक दोन दिवसांपासून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आपले धान्य येथे आणणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देकोरोना पार्श्वभूमीवर निर्णय : धान्य राशीच्या पसाऱ्यातून मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कोरोनाचे संकट सर्वत्र घोंघावत आहे. विविध ठिकाणी अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनाही शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेत आता थेट वजनकाट्यावरच शेतमालाची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे धान्याच्या राशी बाजार समितीच्या आवारात दिसणार नाही.तुमसर बाजार समितीत तुमसर आणि मोहाडी येथील शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणतात. परंतु वेळेवर विक्री होण्याची कोणतीच खात्री नसते. आता तर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दोन महिन्यांपासून बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आहे. मात्र अचानक दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले धान्य येथे आणणे सुरु केले आहे. कोरोनाचा धसका असताना शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. त्यावर बाजार समिती प्रशासनाने उपाय म्हणून शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ खरेदी करण्यासाठी उपाययोजना केली आहे. त्यामुळे थेट वजनकाट्यावर धान्य मोजून तेथे खरेदी केले जाणार आहे.बाजार समितीने यासाठी वजनकाट्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती सभापती भाऊराव तुमसरे, संचालक अरविंद कारेमोरे, अनिल जिभकाटे यांनी दिली आहे. धान्याचा नमुना घेतल्यानंतर धान्य भरलेले वाहन वजनकाट्यावर नेले जाईल. बाजाराच्या आवारात धान्याच्या राशी पसरणार नाही. व्यापारी व शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा होईल. इच्छूक शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणताना गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ विकले जावे यासाठी बाजार समितीने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बाजारातील गर्दीवर आळा बसेल. व्यापारी तसेच शेतकऱ्यांचा खरेदी विक्रीचा वेळ वाचणार आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून येथे धान्याची विक्री करावी. स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये.-मीनाक्षी वासनिक, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर-मोहाडी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी