साकोलीचा वनउपज नाका बंद
By Admin | Updated: August 17, 2015 00:27 IST2015-08-17T00:27:22+5:302015-08-17T00:27:22+5:30
भंडारा जिल्ह्याला गोंदिया व मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्याची हद्द लागून आहे. वनविभागाने २० वर्षांपुर्वी साकोली येथील वनउपज नाका कायमस्वरुपी बंद केला.

साकोलीचा वनउपज नाका बंद
वनतस्करांना रान मोकळे : जिल्ह्यात आठ ठिकाणी नाके
साकोली : भंडारा जिल्ह्याला गोंदिया व मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्याची हद्द लागून आहे. वनविभागाने २० वर्षांपुर्वी साकोली येथील वनउपज नाका कायमस्वरुपी बंद केला. त्यामुळे वनतस्करांना रान मोकळे झाले आहे.
तालुक्याच्या सभोवताल जंगल आहे. जंगलातील वृक्षांची तस्करी वाहणातून होत असल्याने साकोली येथे रार्ष्टीय महामार्गाला लागूनच एक वनउपज तपासणी नाका उभारण्यात आला होता. या नाक्यावर दिवसा व रात्री लाकडे घेऊन जाणारे ट्रक तपासणी करण्यात येत होते. त्यामुळे अवैध वृक्षतोड वाहतुकीवर प्रतिबंध होता. मात्र, २० वर्षापुर्वी वनविभाग साकोली येथील नाकाबंद केला.
भंडारा जिल्ह्यातील कारधा, गिरोला, कालागोटा, चिचोली, जांब कांद्री, मंगरली, निलज व पवनी येथे वनउपज नाके आहेत. या नाक्यावर वनकर्मचाऱ्यांची ड्युटी लागली राहते. जिल्हयात आठ ठिकाणी हे नाके असतांना साकोली येथीलच नाका बंद का करण्यात आला हाही प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील काही गावातून सागवान तस्करी राजरोसपणे सुरु असून आॅर्डरप्रमाणे हातआऱ्याच्या सहाय्याने चिरान करुन वाहनात भरुन पोहचविली जाते. मात्र ही सागवान तस्करी रोखण्यास वनविभागाला अजुनही यश आले नाही.
वाहन तपासणी नाही
साकोली येथील वनउपज तपासणी नाका बंद केल्यानंतर वनकर्मचारी गस्तीवर राहत असले तरी ते वाहन तपासणी करीत नाही. त्यामुळे एखाद्या वाहनातून सागवन तस्करी झाल्यास वनविभागाला माहिती देत नाही.
बंद नाक्याचा फायदा
येथील वनउपज नाका बंद झाल्याने जंगलातून, गावातून होणारी तस्करी करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. त्यांची वाहने तपासणारे कुणीही नसल्याने त्यांना वाहणातून लाकडे नेणे सोपे झाले आहे. त्यामुळे साकोली येथे पुन्हा हा नाका तयार करण्यात यावा, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.