साकोलीची विजया ठरली होम मिनिस्टर

By Admin | Updated: March 27, 2016 00:22 IST2016-03-27T00:22:10+5:302016-03-27T00:22:10+5:30

लोकमत सखी मंच तर्फे साकोली येथील हनुमान मंदिर सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sakoli wins home minister | साकोलीची विजया ठरली होम मिनिस्टर

साकोलीची विजया ठरली होम मिनिस्टर


साकोली : लोकमत सखी मंच तर्फे साकोली येथील हनुमान मंदिर सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विजया मुंगलमारे ही होम मिनिस्टर स्पर्धेची मानकरी ठरली. तालुक्यातील युवती, महिला व सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे व तालुका विभाग प्रतिनिधी सुचिता आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले.
आर.जे. तुषार लोखंडे यांनी सखींना मनोरंजक स्पर्धा खेळविल्या. त्यात डान्स कॉम्बीनेशन, एलिफंट रायनो, बलून्स गेम, म्युझिकल चेअर, लंगडी, चॉकलेट सर्च इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
विविध स्पर्धांमधून दिपा रिनाईत, प्रियंका हलमारे, संगीता खुणे, सरिता नाकाडे, विजया मुंगुलमारे, वृंदा खेडेकर व चंदा पोगळे विजयी ठरल्या. विजयी स्पर्धकांतून झालेल्या होम मिनिस्टरच्या अंतिम स्पर्धेत विजया मुंगलमारे हिला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेसाठी कुंदा गायधने, दिपा करंबे, तृप्ती भोंगाडे, मिनाक्षी आकनोरवार, शालू नंदेश्वर यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे नियोजन व आभार जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी मानले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Sakoli wins home minister